Literature

धर्म व धर्म प्रभू

धर्मकृद्धर्मगुब्धर्मी ( विष्णुसहस्रनाम ) धर्मोत्पादक, धर्मरक्षक व धर्माधार एक परमात्माच आहे. धर्मावनायोरुकृतावतार: (भागवत) परमेश्वराचे सारे अवतार या धर्मरक्षणाकरितांच झाले. धर्ममूलं हि भगवान्— हा परमेश्र्वरच या धर्माचें मूळ आहे. धर्मस्य प्रभुरच्युतः ( विष्णुसहस्रनाम ) — या विश्र्वधर्माचा प्रभुसुद्धां परमात्माच आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽ खिलं । यच्चंद्रमास यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् (भ.गी. ) परमात्म्याचा प्रकाशच या विश्र्वधर्माच्या दिनमणीतून कोंदाटला आहे. परमात्म्याला ‘धर्मोधर्मविदुत्तमः’ ( विष्णुसहस्रनाम ) असे म्हणतात. हा परमात्माच धर्मरूप, तसा धर्मज्ञांत अग्रेसर पण आहे.

home-last-sec-img