Literature

नित्यानित्यविवेक

मीहा अनुभव जाणीवरूप आहे. त्यांत आपले निराकर अद्वितीय, ज्ञानानंदस्वरूप प्रकट होतें. मीया आपल्या अनुभवांत आपला अद्वितीय स्वभावच प्रकटतो, हें विवेक्याला समजून चुकलेलें असतें; एरवी मीहें भान देहाला होत नाही, हें थोडया विचाराअंती कोणालाहि समजण्यासारखे आहे, देहालाच मीहे भान होते, तें देहापासूनच निर्माण होते अथवा तें देहरूपच आहे असे झाल्यास शवांत कां तें दिसून येत नाही ? त्या वेळी मी हे भान देहांतून नाहीसे झालेले असते. मीया आपल्या भानाने द्योतित होणारे चैतन्य असेपर्यंत चेतन आणि तें देहाला सोडून गेलें म्हणजे देह अचेतन होत असल्यामुळे, देह ज्याच्यापासून झाला त्या रजरेताला त्यापासून झालेल्या रक्त, मांस, त्वचा, स्नायु, अस्थि, मज्जा, रेत, केश, नख, आणि इतर लाळ, कफ आदि अजून उच्चारूं नये म्हणून वाटणारे असे पुष्कळ देहांत भरले आहे.  त्या कशालाहि कोणी मीम्हणत नाही आणि ते देहाबाहेर गेले असता, घराबाहेर फेकून दिलें असता, ‘मीदेहाबाहेर गेलों, मी घराबाहेर फेंकला गेलोंअसें कोणालाहि वाटत नाहीं. कातडी फाटली म्हणजे मी फाटलोंअसे वाटत नाही. शस्त्रचिकित्सेनें काढून टाकलेल्या भागांतून मी गेलोंअसे मानत नाहीं. डुकली येऊन देहाचे विस्मरण झालें, देह धाडकन् पटला म्हणून भानावर आल्यावर समजते. या सर्व कारणांमुळे, देहाहून मीहें आत्मीय स्फुरण वेगळे आहे. देह हा अन्नापासून झाल्यामुळे, अन्नाला कोणी मीम्हणत नसल्यामुळे मी अन्न घेतों‘, ‘ मी अन्न सोडतों‘, असा अनुभव असल्यामुळे, या अनुभवानेच ओघाने अन्नापासून झालेला देह मी घेतो आणि मी सोडतों असा अनुभव त्याला असणे स्वाभाविक असल्यामुळेहि देह मीहोत नाहीं या दोन्हींत जमीनअस्मानाचा फरक आहे.

(१) देह दृश्य, मी जाणीव अदृश्य; (२) देह अनेक यो धातूंनी युक्त, ‘मीही जाणीव आपली एक; (३) स्वप्नांत मी आपल्याला या देहावें भान नसते आणि दुसराच देह त्या ठिकाणीं आहे दिसतो, पण आपण मीम्हणून स्वप्नांत असतोच; (४) देहच मी मी झाल्यानंतर मीअसून त्या देहाचे भान नष्ट होणार नाही; –भान (५) स्वप्नांत या देहाचा व जागृतीत स्वप्नदेहाचा भास नाहींसा झाला तरी त्याबरोबर मीहें आपले भान नष्ट होत नाही, झाले (६) सुषुप्तीत तर कोणताच देह आहे असे वाटत नसून आपण तिथे विश्रांति घेत असतो. असे झाले की आपल्याप्रमाणेच आपले मीहे भान देहाहून अगदींच निराळे आहे, हें या सर्व कारणां आहे मुळ सहज सिद्ध होते. भान आपले असल्यामुळे तें देहाचे होत र नाही हे स्पष्ट आहे. आपल्या भानासकट आपण देहाहून भिन्न आहो, हे अगदी या विवेचनानें सूर्यप्रकाशाइतके विवेक्याला स्पष्ट दिसेल. मी दृश्य बघतों, दुसऱ्याचे देह जसे मला दृश्य आहेत. त्याप्रमाणे स्वदेह सुद्धा मला दृश्य आहे. ज्ञानरूपद्रष्टा मी ज्ञेयरूप देहाहून निराळा. वस्त्र पाहणारा वस्त्राहून निराळा. एका कापसाच्या सुताने झालेल्या बंडी आणि कोटाप्रमाणे ती बंडी, तो कोट म्हटल्याप्रमाणे एका अन्नाच्या रजरेताच्या न्यूनाधिक्याने झालेल्या देहांतू ती स्त्री, तो पुरुष असा व्यवहार केवळ नाममात्र होत असतो. या अशा भ्रामक सर्व स्त्रीपुरुष देहांहून मी अगदी निराळा आहे हेंव खरें, देहाचें पांघरूण वस्त्र व माझे पांघरूण देह, त्यामुळे माझ्या भानासह मीदेहाहून अगदीच भिन्न असणारा आहे, असे वाटणे म्हणजे विवेक.

माझ्यासारखेच सर्व देहाहून भिन्न, एक ज्ञानानंदरूप आहेत ” वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोऽपराणि – तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही | (भ.गी. २-२२) ‘एकोऽहं बहु स्याम्,’ बहु व्हावे अश स्वसंकल्पानें तो एकलाचि झाला बहुरूपीअसें असल्यामु माझ्यासकट सर्वांचे स्वरूप एक परमात्माच आहे. अहमयमिदं च वासुदेवः असा विवेक्यांचा अनुभव असतो. जें जें भेटे भूत तें तें मानिजे भगवंत ।असे यामुळेच म्हटले आहे. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ (भ.गी. १८-२०) ज्या ज्ञानानें पृथक् पृथक् असणाऱ्या अनेक प्राणिमात्रांच्या ठिकाणी मनुष्य अविच्छिन्न अशा एका अविनाशी परमात्म्यालाच सर्वसमभावानें बघू लागतो, त्या ज्ञानालाच एक सात्त्विक ज्ञान म्हणतात. समं सर्वेषु भूते तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ (भ.गी. १३-२७) विनश्वर अखिल भूतांच्या ठिकाणी सर्वसमन वाने असणाऱ्या शाश्वत परब्रह्म परमेश्वराला जो सदैव एकरूपानेच बघतो त्यानेच एक ईश्वराने दिलेल्या डोळ्यांचे सार्थक केलें, तोच एक खरा डोळस त्याला एक दृष्टि आहे म्हणून म्हणता येईल. बाकी आंधळेच आंधळे. अन्धेन नीयमामा यथान्धाः|आंधळ्याचे पाठी लागले आंधळे |  ‘समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्॥‘ (भ.गी. १३-२८) सर्वसम, सर्वरूप परमेश्वराच्या यथार्थ दृष्टीने आपलेच रूप परमेश्वराला मानून जो सर्वत्र ते आत्मदर्शन घेतो, त्याला आत्मविस्मृतीनें उत्पन्न होणारे मृत्युरूप कामादि कोणतेहि विकार होत नाहीत. अविनाशी आत्मरूपाची जाणीव त्याला सतत असल्यामुळे नश्वर देहादिकांच्या भानाने आत्मविस्मृति करून घेऊन तो आपला नाश करून घेत नाही. उलट आनंदघन परमात्मैक्यरूपी परमगति म्हणवून घेणाऱ्या मोक्षास प्राप्त होऊन सांसारिक सुखदुखांच्या आघातापासून तो आपली कायमची सुटका करून घेतो.

दुल्लभ शरीरी दुल्लभ आयुष्य । याचा करूं नये नास । दास म्हणे सावकास । विवेक पाहावा ।। (दा. १८-३-१) आत्मा नात्मविवेक करावा । करून बरा विवरावा विवरोन सुदृढ धरावा जीवामध्ये ॥ (दा. १३-१-१) देह अनित्य आत्मा नित्य हाचि विवेक नित्यानित्य अवधे सूक्ष्माचे कृत्य । जाणती ज्ञानी ||२३|| देह म्हणजे हा एक अन्नमय कोशाचा स्थूल देहच नव्हे, तर च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडी। ऐसी अष्टदेहाची प्रौढी ।‘ (दा. ८-७-४१) हे ज्ञानी जाणतात. फार सुक्ष्मबुद्धीचें हे कृत्य आहे असा २३ व्या ओवीच्या उत्तरार्धाचा अर्थ आहे; आणि स्थूल सूक्ष्म कारण तुर्या पिडीं। विराट महत्त्व अव्याकृत मूळ माया ब्रह्मांडी ।असे हे अष्टदेहहि अनित्य आणि यांचा द्रष्टा साक्षी नित्य, असें जाणणे याला नित्यानित्यविवेक म्हणतात हो या ओवीच्या पूर्वार्धाचा अर्थ आहे.

home-last-sec-img