Literature

पढतमूर्ख

सुशिक्षित समाजाला यांतून बरेंच पटेल बरेंच घेण्यासारखे वाटेल. म्हणून पढतमूर्खासंबंधींच्याहि कांहीं ओव्या बधूं : मागां सांगितलीं लक्षणें। मूर्खाआंगीं चातुर्य बाणे। आतां ऐका शहाणे । असोनि मूर्ख ॥ २॥१० ।। १ तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख । अवगुण त्यागितां सुख । प्राप्त होये ॥ २ ॥ बहुश्रुत आणि व्युत्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान । दुराशा आणि अभिमान । धरी तो एक पढतमूर्ख ॥ ३ ॥ मुक्त क्रिया प्रतिपादी । सगुण भक्ति उच्छेदी । स्वधर्म आणि साधन निंदी । तो एक पढतमूर्ख ॥ ४ ॥ आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें । प्राणी मात्राचें पाहे उणें । तो एक पढतमूर्ख ॥ ५ ॥ जाणपणें भरी भरे । आला क्रोध नावरे । क्रिया शब्दास अंतरे। तो एक पढतमूर्ख ॥ १० ॥ दोष ठेवी पुढिलांसी । तेचि स्वयें आपणापाशीं । ऐसें कळेना जयासी । तो एक पढतमूर्ख ॥ १३ ॥ अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणें । जनास निववूं नेणें । तो एक पढतमूर्ख ॥ १४ ॥ जण उणीव ये अंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं । देहबुद्धि जयापासीं । तो एक पढतमूर्ख ॥ १७ ॥ वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटके हावभाव । देवा बिसरे जो मानव तो एक पढतमूर्ख ॥ १९ ॥ भरोनि वैभवाचे भरी । जीवमात्रास तुच्छ करी। पाषांडमत थावरी । एक पढतमूर्ख ॥ २० ॥ नाही भक्तीचे साधन नाहीं वैराग्य ना भजन । क्रियेवीण ब्रह्मज्ञान । बाल तो एक पढतमूर्ख ॥२३॥ न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र । पवित्र कुळी जो अपवित्र । तो एक पढतमूर्ख २४मार्ग एक पुढे एक। ऐसा जयाचा दंडक । बोले एक करी एक तो एक पढतमूखे ॥ २६ ॥ प्रपंचविशीं सादर । परमार्थी ज्याचा अनादर । जाणपणे घे आधार । तो एक पढतमूर्ख २७यथार्थ सांडून वचन । जो रक्षन बोले मन । ज्याचे जिणें पराधेन । तो एक पढतमूर्ख ॥ २८ ॥ निरूपणीं भले भले । श्रोते एक येऊन बैसले । क्षुद्रं लक्षून बोल तो एक पढतमूर्ख ॥३१॥ शिष्य झाला अनाधिकारी  आपली अवज्ञा करी पुन्हां त्याची आशा धरी । तो पढतमूर्ख ॥ ३२ ॥ भरोन बैभवाचे भरीं। सद्गुरूची उपेक्षा करी । गुरु परंपरा चोरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३४ ॥ ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा साची अर्थ । अर्थासाठी लावी परमार्थ । तो एक पढतमूर्ख ॥३५॥ प्रपंच गेला हातींचा। लेश नाहीं परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणांचा  तो एक पढतमूर्ख ॥ ३८ ॥

अगदी शेलक्या अशा थोड्या ओव्या द्याव्यात म्हणून किती हात आंखडता घेतला तरी प्रभु रामरायाच्या भक्ताचे असे कांहीं अचूक अनुभव सांगणारे बोल आहेत की ते वाचतांना ही एक उत्कृष्ट ओवी आहे, आधुनिकांना ही बोधप्रद आहे म्हणून एकेकच ओवी उद्धृत करता करतां बऱ्याच ओव्या घेतल्या जातात. सबंध मुळावरूनच पाहावें हें बरें कारण यांतले कांहींच हिणकस नाही.

home-last-sec-img