Literature

परलोकाचे दोन मार्ग

संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणं चोत्तरं च तद्येह वै तदिष्टा पूर्ते कृतमित्युपासते ते चांद्रमसमेव लोकमभिजयन्ते त एव पुनरावर्तन्ते तस्मात् एते ऋषयः प्रजाकामा दक्षिण प्रतिपद्यन्ते एषः वै रयियः पितृयाणः ।। (प्रश्नो. १-९)

– उत्तरायण आणि दक्षिणायन, देवयान आणि पितृयान, अर्चिरादि आणि धूमादि मार्ग, शुक्ल-कृष्णगति, हे सर्वहि एकार्थी शब्द आहेत. जे इष्टापूर्त म्हणजे देवता आणि पितृ यांच्या तृप्तीकरितां कर्मे करतात ते चंद्रलोकी जाऊन पोहोंचतात. चंद्रलोकापासूनच स्वर्गाचा मार्ग आहे. अशा रीतीनें काम्यकर्माचें अनुष्ठान करून चंद्रलोकद्वारां स्वर्गलोकास गेलेले आपापल्या संचित कर्माप्रमाणें पुनः उच्चनीच योनीतून जन्मास येतात. प्रजेची इच्छा करणारे ऋषी दक्षिण मार्गानुसारी होतात. हा इंद्रियसुखाचा, विषय-वैभवाचा पितृयाण मार्ग होय. इथे —

अग्निज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । 

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥२४॥ 

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । 

तत्र चान्द्रमसं ज्योतियोगी प्राप्य निवर्तते ||२५|| 

शुक्लकृष्णे गती होते जगतः शाश्वते मते । 

एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ||२६|| ( भ. गीता )

या गीतेच्या आठव्या अध्यायाच्या २४, २५, २६ व्या श्लोकांची वाचकांना आठवण होईल.

home-last-sec-img