Literature

पूर्ववयांत मोक्षसाधन

वयसः पतमानस्य स्रोतसो वाऽनिवर्तिनः ।

आत्मा सुखे नियोक्तव्यः सुखभाजः प्रजाः स्मृताः ॥ ३१ ॥

प्रवाहतः प्राप्त होणाऱ्या वृद्धावस्थेला टाळतां येणे अशक्य असे. समजून तारुण्यांतच त्या शाश्वत ब्रह्मानंदाची प्राप्ति करून घ्यावी. आपल्या प्रमाणेच प्रजेलासुद्धा ते ब्रह्मसुख प्राप्त करून देणाऱ्या मोक्षसाधनास लावावे. या लोकांत राजा मंत्री अधिपति पुढारी या सर्वांनी मृत्यु व वृद्धाप्य यांचे स्मरण ठेवून आपल्याप्रमाणेच सर्व प्रजेला पूर्ववयांतच मोक्षमार्गीस लाविलें पाहिजे असा श्रीरामाचा आशय स्पष्ट होतो.

home-last-sec-img