Literature

पूर्वावलोकन

श्रीसमर्थांच्या ह्या उत्सवाला प्रारंभ होऊन पाच दिवस झाले. आतापावेतो श्रीसमर्थ चरित्राचे यामती, यथाशक्ती केले आहे. पुराण सुरु करताना पुराणिकही मागोल संदर्भ जुळवून मग पुराणास प्रारंभ करतात, त्यामागील थोडासा सदर्भ जुळवून आजचे चरित्र प श्रीसमर्थ अंजनेवाचा अवतार होते. म्लेंच्छांचा छळ नाहीसा करून धर्मस्थापनेसाठीच त्यांचा अवतार होता, हे निरनिराळ्या उदाहरणांनी सिद्ध करण्यात आले. हिंदु धर्मावाट करण्याच प्रतिज्ञा करून जनतेची नाना प्रकारे हिंसा करणाऱ्या म्लेंच्छांचा छळ थांबविण्यासाठीच श्रोसमयौनाच अवतार घेणे कम प्राप्त झाले होते. श्रीसमर्थ हे सूर्याजीपंतांचे कनिष्ठ पुत्र. ते ऋग्वेद आश्वलायन सूत्री होते. जब हे त्यांच्या गावाचे नाव. ते वृत्तीने कुलकर्णी होते. त्यांच्या पूर्वजांचा गेल्या एक हजार वर्षाचा इतिहास उपलब्ध आहे. एकवीस पिढयापासून त्यांच्या घराण्यात श्रीराम उपासना चालत आली होती. अशा उपासनेशिवाय त्या  कुळात अवतार उत्पन्न होणे शक्य नव्हते. अशा परिशुद्ध बवतारासाठी बरीच तपश्चर्या केली असली पाहिजे. त्यांच्या घराण्यातील अनेक तपस्व्यांच्या पूर्व पुण्यपरिपाकाचे फलरूप म्हणूनच त्या कालास योग्य अवतार झाला.

पूर्व परंपरा श्रीसमर्थांच्या पूर्वजांच्या इतिहासाला कृष्णापासून सुरुवात होते. म्हणजेच अंदाजे एक हजार वर्षापासून ती सुरू होते असे म्हटले तर वाउगे होणार नाही. ही वेळ अंदाजे शके ८८६ ची असावी. कृष्णाजीपंतांपासून सूर्याजी पंतापर्यंत श्रीराम उपासना खंड न पडता अव्याहत चालू राहिल्यामुळे तिचा प्रभाव त्याच्यावर पडत होता आणि त्यामुळे ते सर्व साक्षात्कारी पुरुष होते. त्या सर्वांना श्रीरामप्रभूंचे दर्शन झाले होते. सूर्याजीपंत तर आपले उपनयन होताच श्रीराम उपासनेस सुरुवात करून ती अत्यंत निष्ठेने करीत. विशेषेकरून सूर्योपासतेंवर त्यांची विशेष निष्ठा होती. त्यांचे वडील त्र्यंबकपंत तर ब्रह्मनिष्ठ व साक्षात्कारी पुरुष होते. ते सूर्याजीपंतांच्या लहानपणीच वैकुंठवासी झाले होते.

सूर्यनारायणाकडून वरप्राप्ती

सूर्याजीपंतानो चोवीस वर्षे सूर्योपासना केल्यावर चोवीस वर्षाच्या शेवटी रथसप्तमोच्या दिवशी त्यांना श्रीसूर्यनायणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. श्रीसूर्यनारायण सूर्याजीपंताच्यासमोर उभे राहून म्हणाले, ‘तू गेली चोवीस वर्ष अखंड उपासना

केलीस तोच मी सूर्यनारायण, तुझ्या भवतीने मी प्रसन्न झालो आहे. तुला पाहिजे तो वर मागून घे.सूर्याजीपंत निस्पृह होते. संसार अशाश्वत आहे हे त्यांना उमजले होते, त्यामुळे यातून मुक्त होण्यासाठी परमात्म्याची प्रार्थना करण हा मूर्खपणा आहे अशी त्यांची पक्की समजूत होती. तसेच ब्रह्मस्वरूपी ऐक्य पावणे हे जीवनाचे कर्तव्य होय हे त्यांना ठाऊक होते. जन्म दुःखकर आहे. व परमात्म्याच्या विस्मृतीनेच जन्म-मरण प्राप्त होते हेही त्यांनी जाणिले होते. परमात्म्याच्या अनंतानंत विस्मृतीस विषयवासना कारणीभूत आहे हेही त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच विषयवासना नष्ट झाल्याशिवाय जन्म मरण चुकणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. संसारातील सुखदुःखाचा अनुभव त्यातून पार होण्यासाठी परमात्म्याची प्रार्थना अह्र्निश करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य होय. सूर्याजीपंताना ऐहिक सुखात काहीही कमी नव्हते. तरी पण त्यांनी त्या सुखाकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यांच्या धर्मपत्नी राणुबाई भगवतभक्तच होत्या. मारुती रायासारखा महात्मा उदरी येण्यासाठी त्या साध्वी ने किती तपश्चर्या केली असेल ? प्रत्यक्ष महादेव उदरी येणाऱ्या त्या साध्वीच्या पातिव्रत्याचे काय वर्णन करावे ? कारण यथाबीजं तथांकुरःबीजाप्रमाणेच अंकुर माता-पित्यांची योग्यता ठरते. या दृष्टीने श्रीसमर्थांच्या मातोश्री ह्या सामान्य नव्हत्या. त्यांच्या पातिव्रत्याचे काय वर्णन करावे ? पातिव्रत्य हेच स्त्रियांचे तप असून त्यायोगे सामथ्र्यं प्राप्तो व ज्ञानही मिळते. सत्ती-पती म्हणज प्रकृती पुरुषांचा अवतार. ज्या प्रमाणे माया परमात्म्याच्या आश्रयास असते त्याचप्रमाणे पत्नीही पति-सायुज्य मिळविते. आचार, विचार वागणूक यामध्ये दक्षता बाळगून संसार केला पाहिजे. आपले पूर्वज ऋषीमुनी सर्व ज्ञादी असल्याने त्यांनी आपल्या

कर्मामुळे उच्चपदप्राप्ती करून घेतली. सूर्याजीपंत व राणूबाई हे दोषही निष्काम होते. परमात्म्याची आराधना हेच आपले इतिकर्तव्य असे समजून उमजून ते आपले जीवन जगत श्रीसूर्यनारायणाने दर्शन देऊन वर मागअसे म्हटले होते असत. सूर्याजोपतानी इतर कोणताही वर न मागता मोक्षाची अभिव्यक्त केल्यामुळे श्री सूर्यनारायण आनंदित झाले. पुत्र प्राप्तांचा वर देण्यासाठीच ते प्रगट झाल्याने आपली मनीषा पूर्ण होत नाही असे दिसताच त्यानी राणूबाईस बोलावण्यास सांगितले पण राणूबाईनीही मोक्षाचीच अपेक्षा केली त्यावेळी सूर्यनारायणांनी जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांनी आपल्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे पुत्र प्राप्ती करून घेणेच योग्यअसे म्हणून तुम्हास पुत्र प्राप्ती होईल व मोक्ष प्राप्तीही होईल. माझा अवतार असलेला गंगाधर नावाचा एक पुत्र आपल्या पोटी यईल. तो सर्वांत जेष्ठ पुत्र होऊन तुमचा वंश चालवील आणि कनिष्ट पुत्र नारायण निवृत्तीमार्गात प्रगती करील असा आशीर्वाद देऊन आपला कार्यभाग साधला म्हणून आनंदित होऊन वे अंतर्धान पावले. इकडे ही पति-पत्नी आपणास श्रीसूर्यनारायणाचे दर्शन झाले म्हणून आनंदित होऊन नित्य प्रमाणे अनुष्ठान करू लागली.

श्रीरामनवमी उत्सव :- श्रीरामनवमी जवळ आली होतो. ह्या उत्सवात श्रीदर्शन व्हावे अशी पति-पत्नीच्या मनात उत्कट इच्छा उत्पन्न झाल्याने त्यांनी सूर्यनारायणाची प्रार्थना केली. कारण मी रामनवमीस दर्शन देईनअसा श्री सूर्यनारायणाने त्यांना दुष्टात दिला होता. सूर्याजाचे बंधू भानोजो गोसावी एकनाथांचे शिष्य होते. एकनाथ महाराजांचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध बा. त्यांचेच ते शिष्य असून उत्तम कीर्तनकार होते. अगदी तन्मय होऊन ते कीर्तन करीत. श्रीरामनवमी उत्सवात त्यांचेच कीर्तन चालू होते आणि अत्यंत तल्लीन होऊन, देहमान विसरून आपल्या मधुरवाणीने ते प्रभू रामरायाचे गुणगान करीत होते. सर्व भक्तपण एक चित्ताने तो आनंद लुटीत होते. दुपारचे बारा वाजण्याची वेळ होती. कीर्तन ऐन रंगात आले होते. सर्व श्रोते तल्लीन होऊन समरूपी आपले मन गुंतवून स्तब्ध होते. कथा ऐकत असता सूर्याजीपंतासअहो ! कुलकर्णीअशा हाका दोन तीन वेळा मारल्याने ऐकू आले. तिकडे लक्ष्य लावून पाहिल्यावर एक रामोशी आपणास हाका मारीत असल्याचे आढळले. त्यास ” काय काम आहे?’ असे विचारताच दोन अधिकारी आले असून त्यांनी तुम्हास बोलावले आहेअसे उत्तर त्याने दिले. सूर्याजीपंतांना कीर्तनातून निघण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अनास्था दाखविली. तेव्हा रामोशी म्हणाला आपण ताबडतोब चला. त्याशिवाय गत्यंतर नाही ते दोघेही खूप रागावले असून त्यांनी तुम्हास ताबडतोब बोलाविले आहे. हे ऐकून सूर्याजीपंतास फारच वाईट वाटले. अरे ! काय हे माझे दुर्भाग्य! केवळ उदररण्यासाठी या म्लेंच्छांचे दास व्हावे लागले ना ! हे अधिकारी असल्याने त्यांची सेवा करणे भाग आहे. याला उपाय नाही असे म्हणून ते खूप अस्वस्थ झाले.

स्वाभिमानशून्यता :- आपल्या मालकाच्या आशेचे उल्लंघन करू नये, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु हे सर्व ठिकाणी लागू नसते. धर्मनिंदक, नीतित्यायहीन, स्वार्थी अशा दोन जनांची सेवा करू नये. त्याकाळी सर्वत्र तीच परिस्थिती होती. धर्माची अवनती झाली होती व सर्व लोक स्वाभिमानशून्य आणि कर्तव्य भ्रष्ट असेच होते. काहीनी मुसलमान अधिका-यांच्या संतोषासाठी आपल्या मुलीही त्यांना दिल्या होत्या ही दुवृत्ती अकबरा पासून सुरू झाली होती. अकबराच्यावेळी राजेरजवाडे आपल्या मुली म्लेच्छ अधिकान्यास देऊन आपण कृत्यकृत्य झालो असे समजत व स्वाभिमानशून्य होऊन काहीही करीत. त्यावेळी धर्मासाठी प्राणार्पण करणारांची संख्या फारच कमी अधिकारांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हा फार मोठा अपराध आहे असे आर्यधर्मीय समजत. विधर्मियांची सेवा करीत असता ते आपल्या धर्माप्रमाणे वागणार्यांना तसे वागता येऊ नये म्हणून प्रयत्नशील असत. इतकेच नव्हे तर ते म्लेंच्छधर्मी कसे होतील यासाठीच ते प्रयत्नशील असत. असे अभिमानशून्य निर्वीर्य, निर्लज्ज पुळचटाप्रमाणे स्वधर्माचा अभिमान सोडून विधर्मियाचा अनुनय करणे व त्यांनाच संतुष्ट राखण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत हीन कृत्य होय, मानवास त्याच्या मरणकाली व नंतरही धर्माचे सहाय्य अत्यावश्यक आहे. प्राणोत्क्रमणाच्या वेळी ही घर्मविस्मरण होणे अयोग्यच. योग्य कुळात जन्मणारांचीच ही लक्षणे होत. धर्माचे वर्णन पुन्हा पुन्हा वर्जून याचे पालन केले पाहिजे. असा उद्घोष शास्त्रे वारंवार करीत आली आहे. श्री मर्याच्या वेळी या विरुद्ध परिस्थिती होती. ह्या विसाव्या शतकातही तीच परिस्थिती आहे. सत्य धमचिया ठिकाणी आज कोणासही आदर नाही. समाजामध्ये आपणास विशिष्ट स्थान असावे यासाठीच कोणी काहीही करण्यास मागेपुढे पहात नाही. यथा राजा तथा प्रजा म्हणीप्रमाणे राज्यकत्यांच्या धोरणाप्रमाणेच सामान्य जनताही धर्म, न्याय, नीती याची चाड न बाळगता ऐहिक सुखलोलुपतेने त्यातच मग्न झालेली दिसते. या गोष्टीमुळे धर्मास ग्रहण लागल्या सारखेच दिसत आहे आणि त्या कारणाने सगळीकडे कुलधर्म, कुछाचार, कुळशील यांच्या नियमांचे उल्लंघन होऊन भ्रष्टता वाढत आहे असो.

श्रीरामदर्शन व वरप्रदान

सूर्याजीपंत कीर्तनात असताना रामोशाने दिलेल्या निरोपा वरून अत्यंत व्यथित अंत:करणाने अरेरे, भगवंताचे मृदुल मधुर, आकर्षक मंगलमय चरित्र श्रवण करीत असता त्यात मन पूर्णपणे विलीन झाल्याने प्राप्त होणान्या दिव्यानंदाचा लाभ सोडून अधिकाऱ्याची आज्ञा पालन करण्याठी जाण्याचा मध्येच प्रसंग यावा ना?’ असे म्हणाले जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. नोकरी म्हटली म्हणजे मनाविरुद्ध असणाऱ्या गोष्टीही करणे भाग पडते. अशा प्रकारे स्वतःच स्वतःस दोष देत अशांची सेवा कोणत्या प्रारब्धामुळे माझ्या नशिबी आलो असे म्हणत अश्रु ढाळीत कीर्तन मध्येच सोडून, दौत, टाक, दप्तर वगैरे घेऊन ते निघाले. चावडीवर दोन लठ्ठ धनुर्धारी गृहस्थ बसले होते. त्यांच्याकडे रामोशाने बोट दाखवून हेच ते अधिकारीअसे म्हटले. मध्येच श्रीमारुती मंदिर होते तेव्हा चावडीकडे जाण्या पूर्वी सूर्याजीपंतानी श्रीमारुतीरायाचे दर्शन घेऊन जावे असे ठरवून श्रीमारतीच्या देवळात गेले आणि श्रीमारुतीस नमस्कार करून हे प्रभोमला या दास्यातून मुक्त कर. उपवास घडले तरी चालतील मात्र अशी दास्यत्वाची परिस्थिती मला आता नकोअशी प्रार्थना करीत असता एक प्रकाश झोत त्याना दिसला. हा काय प्रकार आहे ?” असे आश्चर्याने डोळे ताठ करून पहात असता त्यांना श्रीराम, लक्ष्मण, सीतादेवी व मारुतीराय यांचे दर्शन झाले. त्या दिव्यरूपी दर्शनाने अत्यंत आनंदित होऊन, कोणताही विचार न करता व शरीराची पर्वा न करता त्यांनी श्रीरामप्रभूंच्या चरणावर एकदम लोटांगण घातले. त्यावेळी श्रीरामप्रभूंनी त्याना उचलून बाळा ऊठ | श्रीसूर्यदेवाच्या वचनानुसार आम्ही तुला दर्शन दिले आहे. तुला वर तर आधीच मिळाला आहे. सूर्याच्या अंशाने जेष्ठ व मारुती रायाच्या अंशाने कनिष्ठ असे पुत्र होतील हे सूर्यनारायणाचे वचन खरे होणार असून त्या दोघांनाही मोक्षाची इच्छा असेल. गृहस्थाश्रम पूर्ण करून परमार्थ संपूर्णपणे साधण्याच्या दृष्टीनेच हा वर तुला देण्यात आला आहे. तू कृतार्थ आहेस. कोणतेही दुःख शोक मोहादि बंधने तुला बांधणार नाहीत. आत्मनिष्ठा वाढवून, जनस्वरूपी मग्न होऊन जीवनाचे सार्थक करून घेशील, त्यात मुळीच शंका नाही, एवढे बोलणे झाल्यावर श्रीरामप्रभूंनी त्यांना तू कशासाठी?’ असा प्रश्न केला. तेव्हा म्लेंच्छ अधिका-यांना भेटण्यासाठी आलो होतो व पुन्हा परत उत्सवास जावयाचे आहे असे म्हणून महाराज यापुढे मला म्लेंच्छांचा सहवास होऊ नये. मी आणले दप्तर आपल्या चरणावर अर्पण करतो. असे म्हणत असताच श्रीरामप्रभूनी सूर्याजीपंतांना आलिंगन देऊन, ‘बाळयापुढे तुला कोणाचीही सेवा करण्याची गरज नाही. आवश्यक तो जमीनजुमला तुझ्याजवळ असल्याने तुझे जीवन सुखमय होईल, अधिकारी वर्ग यवन असल्याने परंपरागत वतनदारी सोडणेच योग्य होईल. कारण यवन तुझा तिरस्कार करतात तुला बोलावणारे यवनाधिकारी इतर कोणीही नसून आम्ही तुला येथे बोलावून घेण्यासाठी मारूतीस पाठविले होते. तू आता कृतकृत्य झालास. पावन झालास व मुक्तही झालास. सर्व सुखे आता तुझ्या पायाशी लोळण घेतील असा आशीर्वाद दिला.

सूर्याजीपंतांना मंत्रोपदेश श्रीरामप्रभूंनी शेवटी तुला एक गोष्ट सांगणे आवश्यक वाटते. मंत्रजपयुक्त उपासनेच्या योग साक्षात्कार होण्यास गुरुमुखाची आवश्यकता असते, तुझी उपासना हल्ली योग्य प्रकारे चालू असली तरी गुरुमुख नसल्यामुळे तु पुढे योग्य गुरु पाहून त्याच्या अनुग्रहास पात्र हो असे म्हणताच सूर्याजीपंतांना हसू झाले. प्रत्यक्ष श्रीरामप्रभू असे सांगतात याचे मला आश्चर्य वाटते. मी या बोलण्याचा काय अर्थ घ्यावा ? ‘ अशा विचारात सूर्याजीपंत असतानाच बाळ, तेही खरे बाहे. मी तुझ्या तपाने प्रसन्न होऊन व तुझे शुद्धाचरण पाहूनच तुला दर्शन दिले. परंतु असाच संप्रदाय सुरू झाल्यास गुरुमुखांचे महत्व राहाणार नाही व गुरुपरंपरा चालविण्यास अडचण निर्माण होईल !” असे श्रीरामप्रभु म्हणाले. यावर सूर्याजीपंतांनी मग मी कोठे जाऊ ? कोणाला शोधू ? आपणच माझे गुरु आहात ना ? आपले दर्शन झाल्यावर आपल्या पेक्षा श्रेष्ठ कोण बाहे ? असे विनवून म्हटले. त्यावर ठीक आहे असे श्रीरामप्रभूंनी म्हणून सूर्याजीपंतांना त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. हा मंत्र तुम्हा सर्वांना माहित आहेच. मंत्रोपदेशानंतर मोक्ष प्राप्तीसाठी सूर्याजीपंतांनी वर मागितला व अखिल विश्वास प्रकाशमान करणारे पुत्र तुला होबोत. तुला अचलभक्ति व मोक्ष प्राप्ती होवोअसा श्रीरामप्रभूंनी आशीर्वाद दिला पंत अनन्य भक्तीने त्यांना नमस्कार करीत असताच सर्व अदृश्य होऊन त्या देवळात मारुतिरायाच्या मूर्तीशिवाय काहीही दिसले नाही.

सूर्याजीपंत संतुष्ट होऊन परत फिरले. श्रीरामप्रभूंच्या दर्शनाच्या आनंदात शरीराचे भान हरपून पुढे चालले असता त्याना कीर्तनाचा गजरही ऐकू नाला नाही. ते घराजवळ बाले. त्यांची पत्नी राणूबाई पतीच्या आगमनाची वाटच पहात होती. पतिमुखावर विशेष तेज पाहून आज काही तरी विशेष घडले इतकेच नव्हे तर त्यांना श्रीरामदर्शन झाले यसले पाहिजे असेच तिच्या ध्यानी आले. तिच्या कल्पनेप्रमाणेच झाले होते.

मग सूर्याजीपंतांनी सर्व हकीगत सांगितली. वरदानही सांगितले. येत्या वर्षी आपणास सुपुत्र होणार याचा त्या दोघांनाही अत्यानंद झाला. तद्नंतर एक वर्षांने श्रेष्ठ गंगाधरांचा जन्म झाला व पुढे १-२ वर्षांची म्हणजेच शके १५२०च्या रामनवमीस श्रीसमर्थांचा अवतार झाला. आपण कृतज्ञता प्रगट केली पाहिजे त्याकाळी श्रीसमर्थांचा अवतार झाला नसता तर धर्मनावालाही शिल्लक राहिला नसता, असे इतिहासावरून स्पष्ट होते. म्हणूनच * कृतस्य प्रतिकर्तव्यं एष धर्मः सनातनःया म्हणीप्रमाणे अशा महात्म्यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांच्या उत्सवात त्यांचा आदेश समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून कृतार्थं व्हा !! त्यामुळेच जय पावन होऊ शकेल. अधर्म नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या कृतीची आज आवश्यकता आहे. त्यांच्या आराधनेमुळे ती शक्ती आपणास प्राप्त होईल. काही धर्माभिमान्याना हा विषय समजला असला तरी तो आचरणात कसा आणावयाचा हा मोठा प्रश्न पडतो. त्यांनाही ह्या महात्म्यांच्या कृपाप्रसादानेच मार्गदर्शन होवो.

धर्मकार्यासाठी सर्वविध शक्तीसामर्थ्य तुम्हास प्राप्त होवो अशी श्री प्रभूचरणी प्रार्थना करून आज हा विषय थांबवितो.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

home-last-sec-img