Literature

पौष वद्य तृतीया

मानवशरीराची निर्मिती पंचमहाभूतांकडून झाली आहे. आकाशापासून वायु, वायुपासून अग्नि, अग्निपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून रेत व रेतापासून मानव असे एका मंत्रात म्हटले आहे.

     आपण कोणालाही दुरून हाक मारल्यास ‘ओ’ असे उत्तर मिळते. या ‘ओ’ कारास प्रणव म्हणतात. या प्रणवाने ‘ मीच परब्रह्म आहे ‘ असे ज्ञान होते. प्रणवरूपी ‘ओ’ कारच. आपल्या तोंडामध्ये ‘ओ’ कार रूपाने परिणत झाला आहे. ‘मी’ हेंच मानवाचे पहिले नांव. *’ तस्य वाचक: प्रणव: | ‘* हाक मारल्यास ‘ओ’ हे उत्तर मिळते. नंतर ‘मी’ या एकाच नांवाने उत्पन्न झालेलेआई, वडील, बंधु, भगिनी हे सर्व निरनिराळ्या संबंधाने वेगवेगळे होऊन निरनिराळ्या नावांनी संबोधिले जातात.या विवेचनावरून मनुष्ये जशी सर्व एक, तशी सृष्टीही एकच आहे.

     या परमात्म्यापासून उत्पन्न झालेले देवदेवतारूपानी, सिध्द आदींनी, मनुष्यरूपानी, पशुपक्ष्यांनी, प्राणपानादींनी, धाम्य-वनस्पती-औषधांनी, तप-श्रध्दा-सत्य-ब्रह्मचर्यादींनी, अग्नि-होमद्रव्य-हेमादींनी, भुर्भुवादी लोकांनी, समुद्र-पर्वत, नद्या म्हणजे यच्चयावत सृष्टिकार्यरूपांनी एकमेव परमात्माच आहे, असे श्रुती सांगतात.

  *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img