Literature

पौष वद्य त्रयोदशी

 मानव हा कोणत्याही वर्ण किंवा आश्रमातील असो, ज्याने त्याने आपल्यासाठी असलेली शास्त्रविहित कर्मे निष्ठेने केली पाहिजेत. स्वधर्म परिपालन, गुरूसेवा, स्वस्वरूपमनन, पूर्णभक्ती, परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यता, वैराग्य यांचे आचरण करीत राहिल्यास तो मोक्षाचा अधिकारी होऊन मुक्त होतो. 

        अशाश्वत असलेल्या जगव्यवहारात मीपणाची जाणीव, जागृती – स्वप्न – सुषुप्ती, भूत – वर्तमान – भविष्य यामधून असतेच असते. ती जाणीव असल्याने हे सर्व जग परमात्म संकल्पाची माया आहे हे उघड ठरते व त्यामुळे कल्पनेने हे सर्व जग, मानव देह यांनी कामे ही सर्व मिथ्या आहेत अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ठ होणे हेच ‘ आत्मज्ञान ‘ होय. 

       या नश्वर देहाला बाहेरून सजविण्यासाठी निरनिराळी वस्त्रे, अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणे, साबू यांनी स्वच्छ व सुवासिक करण्याचा प्रयत्न केला तरी देहामधील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध  यांचेही काही वाटत नसते. ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्याने रोग वाढतो तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतो. क्षयी मनुष्याला शृंगार चढविल्यास त्याची व्यथा कमी होईल काय ? त्यासाठी औषध व पथ्य यांचीच आवश्यकता असते. 

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img