Literature

पौष वद्य पंचमी

  एकाच परमात्म्याने आत्मविवेक, आपले बहुरूप, अगाधशक्ती व अगाधलीला दाखविण्यासाठी निरनिराळी रूपे धारण केली. निरनिराळ्या देहात वेगवेगळ्या स्वरूपांनी असलेल्या अहंस्फूर्तीला एकत्र केल्यास ते आत्मस्वरूपच असणार. अशारितीने निरनिराळी असलेली अहंस्फूर्ती एकत्र करून हिरण्यगर्भात प्रविष्ट केल्यास *’ एकोऽहं बहुस्याम् | ‘* या श्रृतीवाक्याप्रमाणे ‘ मी एकच असून बहुरूपी झालो आहे ‘ असा हिरण्यगर्भाने संकल्प केला असल्यामुळे *’ सर्वाहंमानी हिरण्यगर्भ: | ‘* असे म्हटले आहे. तोच या सर्व मीपणाच्या जाणीवेस कारणीभूत आहे. म्हणजेच मीपणाची स्फूर्ती हे सर्वाआधीचे परमात्मस्वरूप. ही सर्व विभिन्न रूपे हिरण्यगर्भात एकत्रित केल्यास *’ बहुस्याम् ‘* हा संकल्प जाऊन फक्त *’ एकोऽहं ‘* शिल्लक राहील. म्हणजेच बहुत्व नाहीसे होऊन एकत्व शिल्लक राहील. जगत् संकल्पहित असे जे निर्विकल्प रूप तेंच ब्रह्म होय असे विवेकी मनुष्याने पूर्ण विचार करून *’ अहं ब्रह्मास्मि ‘* या वेद महावाक्याद्वारे ते ओळखले आहे.

     एका महान ज्योतीने असंख्य दिवे पेटविता येतात तद्वत् जगास प्रकाश देणाऱ्या महाज्योतिरूप परमात्म्यापासून आपण उत्पन्न झालो आहोत. 

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img