Literature

पौष वद्य षष्ठी

 अखंड ज्योतिस्वरूप असलेल्या आत्म्यास मीपणाची जाणीव होऊन निरनिराळ्या वस्तूंची इच्छा झाली. मीपणाची इच्छा नसती तर काहीच झाले नसते. आपल्यापासून उत्पन्न झालेल्या स्फूर्तीने एक, दोन, तीन अशाक्रमाने या अनंत सृष्टीची उत्पत्ती झाली. एक असल्यावर त्यातून दुसरे कसे उत्पन्न झाले ? हा प्रश्न उद्भवल्यास आधुनिक प्राणिविज्ञानशास्त्रवेत्ते ‘ एकाचे तुकडे केल्यास दोन, दोनाचे चार व पुढे असंख्य तुकडे होतील ‘ असे म्हणती. तर हे कसे शक्य आहे ? कारण एकचएक असता स्त्री-पुरूष ही निराळी उत्पत्ती या शास्त्राने कशी होणार ? परमात्म्याने आपले दोन भाग केले. उजवा भाग पुरूष व डावा भाग स्त्री व तीच पती-पत्नी. पती-पत्नी हे निरनिराळे दिसत असून त्यांचे मूळ एकच असता काम संकल्पाने प्रेरित होऊन त्यांचे बहुरूपात रूपांतर होते. हाच गृहस्थाश्रम. परमात्म्याची सृष्टी हाही विशाल गृहस्थाश्रम होय.

     परमात्मा निर्विकारस्वरूपी व एकमेवच आहे असे जाणणे हा संन्यासाश्रम होय. संन्याशास वेगळेपणा नसतो. सर्व विश्व तो एकच समजतो. नित्य, निर्विकार विश्वाला तो ‘ सोऽम् ‘ असेच म्हणतो. गृहस्थाश्रम सृष्टिसंकल्पयुक्त आहे तर संन्यासाश्रमात मीपणास वाव नाही. तो संकल्परहित असतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img