Literature

पौष शुद्ध अष्टमी

दृश्य पदार्थाच्या उपभोगाचा विचार केल्यास देहामध्ये 

‘मीपणाची’ जाणीव नसल्यास दृश्य पदार्थाचे प्रयोजन मुळीच नसते. आपल्याजवळ असलेल्या सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आपल्या प्राणोत्क्रमणानंतर काहीच उपयोग नसतो. कारण त्या परिस्थितीत देह कोणताही उपभोग घेऊ शकत नाही.  याला एकट्याला काही करता येणे शक्य नाही. एखादा मनुष्य निरनिराळ्या प्रकारच्या फळांच्या ढिगाऱ्यात झोपून राहिला तर  त्याला या फळाचा स्वाद मिळत नाही. जागृतावस्थेत निरनिराळ्या विषयात गढून गेलेल्या मनुष्यास आपल्या जवळपास असलेल्या पदार्थांची जाणीवही होत नसते. जेवतांना मनुष्य विचारचक्रात असल्यास तो फक्त पोट भरून घेण्याचे कार्य करतो, पण त्यास स्वाद कळत नाही. *’अन्यत्रमना अभूवं नापश्यम’* ‘माझे मन दुसरीकडे असल्याने मी पाहू शकलो नाही’ असा अनुभव येतो, असे श्रुती म्हणते. मन दुसरीकडे भटकत असेल तर आपल्या जवळच्या वस्तूचे अस्तित्वही कळत नाही.

       कोणत्याही पदार्थाविषयी इच्छा उत्पन्न होऊन देश, काल, मान व परिस्थितीच्या अनुकूलतेने त्याची आवश्यकता वाटल्यास अनुकूल अशा भावनेने बाह्य पदार्थांचा संग्रह होतो. नंतर त्या पदार्थांच्या निरनिराळ्या मिश्रणाने इच्छित वस्तु तयार करून तिचा उपभोग घेतला जातो.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img