Literature

पौष शुद्ध चतुर्थी

चिन्मात्र, सर्वव्यापारी, नित्य, पूर्ण सुखरूपी, अद्वितीय असे फक्त साक्षात ब्रम्ह हेच असून इतर कोणीही नाही. ब्रम्हज्ञानाचीही अशीच स्थिती असते.  

     श्रवणादि ज्ञानेंद्रियकर्मे, बोलणे आदि कर्मेंद्रिय कर्मे, संकल्प, निश्चय, चिंतन आदि मनाची कर्मे यांचा भास ज्यामुळे होत नाही अशा ज्ञान प्रकाशाला प्रज्ञान म्हणतात. 

*प्रज्ञानमेव तद्ब्रम्ह सत्यं प्रज्ञानलक्षणम्  |*

*एवं ब्रम्ह परिज्ञानादेव मर्त्योऽमृतो भवेत ||*

 हे प्रज्ञानच ब्रह्म होय. तेच सत्य व शाश्वत असू शकते. अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यास मर्त्य अमर होतो. *सर्व तत् प्रज्ञाननेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञाप्रतिष्ठे प्रज्ञानं ब्रम्ह |’* इंद्रियादि कर्माचे ज्ञान, मन व बुद्धी यांच्या संवेदना,  श्रद्धा-अश्रद्धा, धैर्य -अधैर्य इत्यादि भाव, देवता, राक्षस (तिर्यक्) व  मावरूप असलेल्या चराचरांचे दर्शन घडविणारे एकमेव अज्ञान ब्रम्हच होय. यालाच अविनाशी ज्ञान, शाश्वत प्रकाश, अमर प्रभा असे म्हणता येईल. ही प्रज्ञानदृष्टी सर्वांमध्ये असते. सर्वांना सर्व व्यवहारात आवश्यक असलेली अंतश्चक्षूची  दृष्टी म्हणजेच ‘प्रज्ञान’ हे त्रिकालबाधित  आहे. हे प्रज्ञान म्हणजेच परब्रह्म असेच ऐतरेयोपतिदांत म्हटले आहे. 

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* 

home-last-sec-img