Literature

पौष शुद्ध त्रयोदशी

 परमात्म्याचा संकल्प अमोघ आहे. त्याच्यामध्ये सर्व शक्ती केंद्रित झाल्या असल्यामुळे त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. युध्दाकरिता अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याचा आश्रय घेतला तर दुर्योधनाने यादवसेना घेतली. पण त्याचा काय शेवट झाला हे आपणास माहित आहे. हे जग परमात्म्याशिवाय कुचकामी, अचेतन, शक्तिशून्य व प्रभावहीन आहे. परमात्मशक्तीपुढे जगत् शक्तीचा मुळीच पाड लागत नाही. 

     जगतांना परमात्म्याशिवाय काहीही नाही, तोच जगाला कारणीभूत आहे. त्यात पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही सृष्टीची बीजे होत. ती एकापेक्षा एक सरस व शक्तिमान आहेत. पण या सर्वांपेक्षा परमात्म्याची शक्ती अत्यंत प्रबल आहे. ज्याला परमात्म्याचे ज्ञान झाले आहे असा मनुष्य *’ योगी ‘* किंवा *’ सिध्दपुरूष ‘* होय. तो *’ सोऽहं ‘* म्हणतो. तो परमात्म्यात विलीन होतो. त्याची शक्ती म्हणजेच परमात्मशक्ती अशा पूर्ण सिध्दांना अणुबाॅम्ब काय करू शकेल ? 

     सर्वसामर्थ्याचे मूळकारण, आपल्या देहात परमात्मा असल्याची जाणीव असणे हे होय. ही जाणीव झाल्यावर कोणत्याच पदार्थाविषयी इच्छाच होत नाही व त्या पदार्थाबद्दल इच्छाच नसते. त्या पदार्थास मुळीच किंमत नसते.

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img