Literature

पौष शुद्ध दशमी

  जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणाऱ्या क्रूर मनाला अॅटमबाॅम्बचे महत्त्व वाटत असते. तर दयाशील असणाऱ्या साधूस दान, धर्म व परोपकार यांचीच जास्त किंमत वाटत असते. क्षुधेने व्याकुळ झालेल्या भिकाऱ्यास त्यास मिळालेल्या एक घासभर अन्नाचे महत्त्व अॅटमबाॅम्बपेक्षा जास्त आहे. कारण अपेक्षित वस्तु प्राप्त झाल्यामुळे मनाचे समाधान झाल्यानेच अॅटमबाॅम्बपेक्षा त्या घासभर अन्नास जास्त महत्त्व आहे. याचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. एकंदरीत कालमानानुसार उद्भवलेल्या व्यक्तिगत अपेक्षेच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या पदार्थाची किंमत ठरत असते व त्या त्या पदार्थाचे महत्त्व वाढत असते. 

     जगोत्पत्तीस आधिभौतिक सिध्दांत जसा कारण आहो तसाच अध्यात्मिक सिध्दांतहि कारण आहे. *’इच्छामात्रं प्रभो: सृष्टि: |’* जगोत्पत्तीस सर्वशक्तीमान असणाऱ्या परमात्म्याची इच्छाच कारणीभूत आहे असा अध्यात्मिक सिध्दांत आहे. 

     जग हे परमात्म्याच्या मनःसंकल्पामुळे उत्पन्न झाला आहे. मनामुळे इच्छेची व इच्छेमुळे पदार्थाची उत्पत्ती होत असते. इच्छा हा मनाचा धर्म आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img