Literature

पौष शुद्ध नवमी

बाह्यपदार्थ कितीही चांगले असले तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी चैतन्याच्या अस्तित्वाची आवश्यकता आहे. हे चैतन्य देहामध्ये नसले तर त्या पदार्थाचा काहीच उपयोग नाही. डोळ्यालाच बाह्यसृष्टीचे सौंदर्य दिसते. डोळ्याला दृश्यमान होणारे तेज म्हणजेच देहातील प्रकाश. अंधाला बाह्य रूपाचे दर्शन होत नसल्याने त्याला त्याचे महत्त्व वाटत नाही. मूर्ख ,मुर्च्छित व जड अशांना कोणत्याच वस्तूंचे महत्त्व वाटत नसते. यादृष्टीने विचार केल्यास बाह्य पदार्थामध्ये काहीही खरे नाही हेच उघड होते. भोगी मनुष्यास त्या त्या पदार्थाचे महत्त्व वाटत असते. बाह्य पदार्थाचे सामर्थ्य ज्ञानाने समजून येते. या बाह्य पदार्थात स्वतःचे सामर्थ्य नसते तसेच त्यांची जाणीव होण्यास चैतन्याचीच आवश्यकता आहे.

    इच्छा किंवा संकल्प मनोधर्म आहेत. इच्छा उत्पन्न झाल्यावर मन जागृत होऊन इंद्रिये कार्यान्वित होतात. इच्छेच्याद्वारे पदार्थांचे महत्व ठरत असते व इच्छेनुसार ते वाढत असते. यावरून पदार्थांचे महत्व त्या पदार्थात नसून ते इच्छेवरच अवलंबून आहे हे उघड आहे.

*श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img