Literature

पौष शुद्ध पंचमी

मध पाहिल्यानंतर तो कोणकोणत्या फुलांमधून गोळा केला असावा हे जसे सांगता येणे शक्य नाही. त्याप्रमाणे जगत्सारभूत असणाऱ्या ब्रम्हस्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर ज्ञानीजनांची गतहि तशीच होते. समुद्रास निरनिराळ्या नद्या मिळून तद्रूप होतात. तद्वत ज्ञानी मनुष्येहि ब्रम्हस्वरूप होतात.  दावाग्नीच्या ज्वाला जरी निरनिराळ्या दिसत असल्या तरी त्या सर्व दावाग्नी स्वरूपात विलीन होतात.  त्याप्रमाणे अविनाशी अशा ब्रह्मस्वरूपात अनेक भावना निर्माण होत असल्या तरी त्या शेवटी ब्रम्हरूपांतच विलीन होतात.  

     *तमात्मस्थं येऽनु पश्यन्ति धीरास्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषां |* *तेषां शान्तिः शाश्वति नेतरेषाम्  |’* ज्ञानस्वरूपी परमात्म्यालाच जे अज्ञानी आत्मस्वरूप समजतात त्यांना शाश्वतसुख,अचलशांति प्राप्त होते असे कंठोपनिषदांत म्हटले आहे. 

      *’तमेव विद्वानमृथ इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते |’* परमात्मस्वरूप जाणणारा या जन्मीच अमर होतो हा भवसमुद्र पार करून मृत्युरहित होऊ इच्छिणाऱ्यास आत्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही, असे श्रुतिवचन आहे. 

        अमरप्रभा म्हणजेच अविनाशी आत्मज्ञानरुप हे असून ते समजणे किंवा प्राप्त करणे म्हणजेच तद्रूप होणे असा त्याचा अर्थ होय.

 *श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* 

home-last-sec-img