Literature

प्रातःचिंतन

प्रत्यहं प्रातरुत्थाय चिंतयेदात्मनो हितम् । प्रति दिवशी प्रातःकाली उठून आत्महिताचे चिंतन करावें म्हणून शास्त्रवचन आहे. बुद्धिजीवी अशा सकळ प्राणिवगांत अग्रगण्य असणारे आम्ही मानव, सर्वहि एकत्रित होऊन या प्रबोध-प्रातःकाली आपल्या हिताचा विचार करणे अत्यंत आवश्यक नव्हे काय ! या प्रातःसमयी आनंदधन अशा विशुद्ध परमात्म्याचे चिंतन करणें आपले कर्तव्य नव्हे काय ?

home-last-sec-img