Literature

फाल्गुन वद्य चतुर्थी

निरालंबोपनिषदामध्ये ज्ञान व अज्ञान यांची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.

देह इंद्रिय मन यांचे संयमन, सद्गुरूच्याठायी अनन्यभक्ति, वेदांतश्रवण, त्याचे यथायोग्य मनन, निश्चयाने ब्रह्मात्मस्वरूपनिदिध्यास व त्यायोगे पहाणे आणि दृग्गोचर होणाऱ्या सर्व दृश्य वस्तूंत अंतस्थ असणारे सर्वांशी सम घटांत मृत्तिका, वस्त्रामध्ये सुत, निर्माण झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अविकारी स्वरूपांत स्वतःच व्यापून राहिलेले, मातीपासून मडके, सुतापासून वस्त्र याप्रमाणे उत्पन्न झालेल्या सर्व नामरूपादि स्वतः असून म्हणजेच एकमेव आत्मचैतन्याखेरीज काहीही नाही; अशाप्रकारे स्पष्टरितीने अनुभवास येणारा जो आत्मसाक्षात्कार त्यालाच ‘ज्ञान’ असे म्हणतात.

ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो त्याचप्रमाणे अद्वितीय, सर्व हृदयस्थ, सकलरूप असणारे जे एकमेव ब्रह्म, त्यामध्ये देवता, यक्ष, राक्षस, भूतपिशाच्चादि, पशुपक्षी, कृमिकिटक वृक्षलतादि, स्त्रीपुरूष, वर्णाश्रम, बंधमोक्ष असे नानाविध, विविध नामरूपांच्या उपाधीने युक्त असे केवळ नानात्मभेद आहेत. त्यांचे कल्पित ज्ञान असणे यासच ‘अज्ञान’ असे म्हणतात.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img