Literature

फाल्गुन वद्य द्वादशी

आपला धर्म वैदिक धर्म होय. वेद हे त्याचे मुळ व वेदापासूनच धर्माची उत्पत्ति. या वैदिक धर्मास ‘सनातन धर्म’ असेही म्हटले जाते. वेदच प्रमाणभूत असल्याने हा सनातन धर्म वेदांच्या इतकाच पुरातन आहे. वेद समजून घेण्यासाठी श्रुतीच मुख्य आधार असल्याने श्रुतीमुळे वैदिकधर्म समजणे शक्य होते.

श्रुति म्हणजे ऐकणे व स्मृति म्हणजे आठवण. यामुळे ऐकणे व आठवणे हे पुरातन ऋषींचे कर्तव्य होते. यामुळे ऐकविणारे व सांगणारे कोण असा प्रश्न निर्माण झाल्यास परमात्माच वेदांचा कर्ता. वेद मनुष्यनिर्मित नसून अपौरूषीय आहेत.

जगाची धारणा करणारा तो धर्म होय. धर्म नसेल तर जगाचा विनाश ठरलेलाच. प्रापंचिक व पारमार्थिक मार्ग सुगम करणे हेच धर्माचे कार्य होय. ज्या आचरणामुळे प्रापंचिक व्यवहार आदरणीय आणि सुकर होऊन मोक्षास साधनीभूत होतील तोच धर्म. म्हणूनच धर्म ऐहिक व पारमार्थिक सुखप्राप्तीसाठी आवश्यक आहेत. श्रुति, स्मृति, धर्माचा उपदेश करतात, ‘श्रुति, स्मृति माझ्याच आज्ञा आहेत. ‘ असे भगवंतानी म्हटले आहे. भगवंताच्या आज्ञांचे उल्लंघन करणारा द्रोहीच समजला पाहिजे. श्रुतिस्मृतिंच्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्यावर परमात्म्याचा अनुग्रह होतो.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img