Literature

फाल्गुन वद्य सप्तमी

दोरीच्या ठिकाणी सर्प, वृक्षाच्या ठिकाणी भूत किंवा चोर, शिंपल्याच्या ठिकाणी चांदी, वाळवंटात मृगजळ, स्फटिकांत रेषा याप्रमाणेच ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भिन्नता विविधता यांनी युक्त असणारे भासमान जग हा आभास भासमान होत असल्याने भ्रमयुक्त अशी जन्ममरणादी दुःखे आपली पाठ सोडणार नाहीत हे ध्यान्यात धरून, हे सर्व अज्ञान नाहिसे करून, ब्रह्मस्वरूपांत विलीन होऊन, जन्ममरणादी दुःखापासून मुक्त होण्यासाठी योग्य संस्कारांनी एकात्म ब्रह्मभावना निश्चयरूप साधनाने वाढवीत जावी. यालाच ‘मोक्षमार्ग’ असे म्हणतात.

याच्याविरुद्ध भिन्नता, विविधता, देहाभिमान, विषयसुखकल्पना, कर्तुत्व, भोक्तृत्व, इत्यादी संस्कार वाढविणे हे होय. हा संसारमार्ग आहे; असे वेदोपनिषदांत सांगितले आहे. देहरुपी नावेत बसून पुढे जाणाऱ्या व्यावहारिक जीवनरूपी समुद्राचा प्रवास करणाऱ्यांनी अद्वितीय ब्रह्मेकता धृवताऱ्याप्रमाणे अचल आहे हेही नेहमी लक्षांत ठेवले पाहिजे.

*’ज्ञात्वा कर्माणि कुर्वीत |’ ‘सोऽहं भावयेत् |’ ‘ स विजिज्ञासितव्यः |’* *’ ॐ इत्यात्मानं ब्रह्मोनैके कुर्यात् |’ ‘ ॐ इत्यात्मानं युञ्जीत |’* इत्यादी वाक्यांचे हेच तात्पर्य आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img