Literature

फाल्गुन शुद्ध चतुर्थी

*’श्रेष्ठेष्वनुरागो भक्तिः |’* अनुराग म्हणजेच भक्ति. स्थान भिन्नतेमुळे अनुरागाचा अर्थ प्रीती, प्रेम, प्रणय, भक्ति इत्यादी होतो.मात्र हा अनुराग श्रेष्ठ लोकांबद्दल असेल तरच त्याला भक्ति म्हणतात. परमेश्वराविषयी असलेले निरतिशय प्रेम म्हणजेच भक्ति होय.

*’सा त्वस्मिन् परमेप्रेमरूपा अमृतस्वरूपा च. |* परमात्म्यासंबंधी असलेली निष्काम भक्ति अमृतस्वरूप असल्याने ती नाशवंत नसते. सर्वात्म असा परमात्मा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट आहे अशा भावनेने दिन प्रतिदिन दृढ, दृढोतर होत जाणाऱ्या अनन्यासक्त भक्तीसच ‘पराभक्ति’ म्हणता येईल. तीच *’सा पराभक्तिरीश्वरे’* परमेश्वराची सर्वोत्कृष्ट भक्ति होय.

परमेश्वराने आपल्यावर कृपा करावी यासाठी आपण काय केले पाहिजे? असा प्रश्न निर्माण होतो. आपल्यावर आई-वडिलांचे प्रेम कायम राहण्यासाठी काय करावे लागते? त्याचप्रमाणे ईश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काय करावयास हवे?

आई-वडिलांची सेवा करीत असता व त्यांच्या आज्ञेचे पालन केले असता त्यांचे प्रेम मुलाबाळांवर कायम टिकून राहते ही गोष्ट प्रापंचिक असलेल्या तुम्हा सर्वांना माहित आहेच. आपण सर्वजण परमेश्वराची मुले असल्याने त्याच्या कृपाप्रसादासाठी त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे आणि त्याची सेवाही केली पाहिजे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img