Literature

फाल्गुन शुद्ध चतुर्दशी

प्रत्येकाने अत्युच्च ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ध्येयपूर्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असले पाहिजे आणि असे ध्येय बाळगणारा मनुष्य सामान्यजनापेक्षा श्रेष्ठ होय’ असे माझ्या विद्यार्थीदशेत एका संदर्भात अध्यापकांनी सांगितल्याचे मला आठवते. त्याचा विचार करीत असता उपनिषद् – प्रतिपाद्य अध्यात्मिक निष्ठेपेक्षा दुसरे कोणतेही श्रेष्ठ ध्येय नाही असे मला आढळून आले. यापूर्वीही अध्यात्मिक विचारात गढून जाऊन ते साध्य करण्यासाठी तप करण्यास जावे असा विचार मनांत नेहमी घोळत होताच. ब्रम्हस्वरूपांत निष्ठा ठेंवणे हे सर्व तपापेक्षा श्रेष्ठ तप आहे असे माझ्या मनाने पुर्णपणे ठरविले. तसेच प्रथमतः तत्स्वरूप होऊन नंतर त्याच्या उपदेशाने इतरांचा उद्धार करता येईल अशीही माझी खात्री झाली.

जगांतील कोणतेही कार्य करावयाचे असल्यास ब्रह्मस्वरूपनिष्ठेखेरीज अन्य तपाने ते साध्य होत नाही असे समजून तेच तपवर्धन करण्यासाठी मी निश्चयपुर्वक प्रयत्न केला. सुसंस्कृत मानवाच्या स्वभावधर्माप्रमाणे ब्रह्मविद्येनेच आपल्या ध्येयपूर्तीसाठी योग्य असे वातावरण त्यावेळी निर्माण होणारच असा निश्चय करून मी विद्याभ्यास सोडून तपश्चर्या करण्यास निघालो.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img