Literature

ब्रह्मचर्य मनोजयाचा मार्ग

पञ्चविंशति पर्यन्तं ब्रह्मचर्य समभ्यसेत् बलवान् शक्तिसंपन्नः शतायुस्तु भविष्यति ॥ पंचवीस वर्षापर्यंत भावी सुखमय जीवनाच्या दृष्टीनें प्रत्येकानेंच अस्खलित ब्रम्हचर्य पाळले पाहिजे. जर या वयाच्या पूर्वी वीर्यनाश झाला तर त्याचे शरीर, मन आणि इंद्रिय दुर्बल होते. कशाचीहि धारणा टिकत नाहीं आणि मनाचा संयम साधता येत नाही, तें ध्यानधारणेंत स्थिर करतांहि येत नाहीं प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीलाहि तो अधिक प्रमाणांत मुकतो. मिळावयाच्या प्रमाणांत तें विषयसुखहि त्याला मिळेनासे होते. पंचवीस वर्षांपर्यंत देह, इंद्रिय, धातु आदिकांची वाढ होत असते, तोपर्यंत वीर्याचा साठा झाला म्हणजे शरीर बलवान होते. दिव्य मानसिक शक्तिहि येते आणि तो शंभर वर्षाचा पूर्णायुषी होऊन पुढच्या जीवनात सुखशांतीने नांदतो. पंचवीस वर्षानंतर प्रवृत्ति का निवृत्ति तें ठरवून प्रवृत्ति अथवा निवृतिमार्गाचा आश्रय

करावा • ‘पञ्चविन्शे ततो वर्षे पुमान्नारी तु षोडशे ।‘ सोळा वर्षेपर्यंत स्त्रीदेहाची आणि तद्वत् धातूची वाढ होत असते. तोपर्यंत ब्रह्मचर्यानेच असावें. ‘पूर्णषोडशवर्षा स्त्री पञ्चविशेन संगता ।।‘ पंचवीस वर्षांपर्यंत अस्खलित ब्रह्मचर्याने वागलेल्या पुरुषाने विध्युक्त लग्न करून स्वजातीय सोळा वर्षापर्यंत ब्रह्मचर्याने वागलेल्या भार्येसह गृहस्थधर्म चालविला तर ‘वीर्यवन्तं सुतं सूते ।‘ वीर्यवान् तेजस्वी संतति होते आणि संसारातल्या सुखाच्या दृष्टीने संसारहि सुखाचा होतो..

दर्शनं स्पर्शनं केलिः कीर्तनं गुह्यभाषणम् संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेव च । एतन्मैथुनमष्टाङ्ग प्रवदन्ति मनी षिणः ॥ (कठरुद्र. उ. ५-६) हे श्लोक बऱ्याच ठिकाणी आले आहेत. (१) आकृष्ट होऊन स्त्रियांना पहातच उभे राहणे, य पहातच बसणे, त्यांची आकृति मनापुढे आणणे; (२) स्पर्श करणे, (३) त्यांच्याशी थट्टामस्करी, विनोद करणे, त्यांच्याबरोबर गं पोहणे, खेळणे; (४) त्यांच्या रूपाचें, गुणांचे वर्णन करणे; T त्यांच्या चालण्याची, वोलण्याची, हावभावाची नक्कल करणे, सं (५) एकांतांत वोलत बसणें; (६) त्यांच्याबरोबर अमुक करीन, तमुक करीन म्हणून मनांत संकल्प करणे; (७) विवाहादिकाचा सें निश्चय करणें (८) आणि प्रत्यक्ष क्रियानिष्पत्ति-असे कमी अधिक प्रमाणाचे आठ प्रकारचे मैथुनच मानले आहे. अनुक्रमे सातपर्यंतची ही आठव्या क्रियानिष्पत्तीची सौम्य आणि तीव्र अर्शी पूर्वपूर्व रूपेंच आहेत. यापैकी एक एक असले तरी ते थोड्याफार काळांत शेवटच्या पायरीवर आणून सोडल्याशिवाय रहाणार नाही. तेव्हां भावी गृहस्थ होऊ पाहणाऱ्या तरुणाने कोणत्याही विवाहित अथवा अविवाहित स्त्रीशी, गृहस्थाने स्वेतर स्त्रीशी अशा रीतीने आचरण ठेवू नये. यांत भ्रष्ट होण्याची अधिक शक्यता आहे.

निःस्पृह साधकानें यापासून चांगलाच बोध घ्यावा. त्याच्या ठिकाणी हे मुळीच काही असू नये. स्त्री-चित्र पहाणे, स्पर्शणेसुद्धा निःस्पृहाने करूं नये. अशा अर्थाचीं पुष्कळ वचन आहेत. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, ही म्हण प्रत्येकानेच लक्षात ठेवावी.

एकपत्नीव्रत, पातिव्रत्य हे गृहस्थाश्रमाचें तप आहे. तें मोक्षार्थ्यानेच काय, सर्वांनींहि पाळलेच पाहिजे. स्त्रीपुरुषांतून असणारें अद्वितीय मीहे परमात्म्याचे भान स्त्रीपुरुषांच्या भिन्न रूपानें सृष्ट्योन्मुख अशा आपल्या या जगदात्म्याचाच बहुविध होण्याचा तो संकल्प संततिरूपानें पूर्ण करीत असते. स एकाकी नंव रेमे स द्वितीयमच्छेत् आत्मानमेव द्वेधाऽपातयत् । *** (बृ.उ.अ. १ ब्रा. ४) सोऽकामयत द्वितीयो म आत्मा जायेतेति। (बृ. उ. अं. १ बा. २-४) सृष्टयुद्देशाने परमात्म्याचे एक मी भान द्विधा होऊन ज्या आपल्या दुसऱ्या एका आत्मरूपाची पिंड ब्रह्मांडोपाधीने इच्छा करतें, तेंच त्याचे दुसरे रूप ह्मणजे स्त्री अथदा प्रकृति. विराट् पुरुषाने आपल्या एका देहाच्या डाव्या उजव्या भागांपासून सतीपतीची जोडपी निर्माण केली व त्यामुळेच सतीपति हे एकादेहाचे वाम-दक्षिण असे दोन भाग आहेत. परस्परांच्या देहाच्या डाव्या उजव्या भागाप्रमाणे दोघांनीहि एकदेहन्यायाने रहावें, असें अद्वितीय आत्मरूपाच्या प्राप्तीकरीतां, एकत्वाचा निश्चय होण्याकरितां व भेदाच्या लयाकरितां धर्म शास्त्र गृहस्थांना सांगतें. ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने यांत कल्याण आहे. वामभागापासून स्त्री झाली असल्यामुळे सतीला वामा असे म्हणतात. गृहस्थाश्रमांतहि केवळ देहाकाराने परस्परांकडे न बघतां दोघांतल्या मीपणाच्या यथार्थ अद्वितीय आनंदघन स्वरूपाची आपल्या यथार्थ आत्मरूपाची ठेवून दर्शन परस्परांत घेत म्हणजे वैषयिक दृष्टि क्रमा कमी होत होत दोघेहि पुढे विरक्त होतात. अद्वितीय मीसती, पति आणि संतति यांतून गोचर होत असलेले मनांत वाग म्हणजे क्रमेण गृहस्थाश्रमहि मोक्षाचे कारण होऊ शकतो. मी लिहिलेल्या आर्य संस्कृति या ग्रंथांत पान ३४४ ते ३७० याचेच विस्ताराने वर्णन आहे. निःस्पृहाबरोबर ओघानें गृहस्थांनाहि मार्गदर्शन अविवाहित तरुणतरुणींना मनोजयाचा मार्ग मिळावा, या उद्देशाने इथे थोडा ओझरता उल्लेख केला एवढेच. या संदेशांत आलेला वाचल्याने सर्वांनाच मार्गदर्शन होईल; गृहस्थाश्रम साधून थोडा थोडा अभ्यास करण्यास अनुकूल होईल.

home-last-sec-img