Literature

ब्रह्म लोकगमन

अथोत्तरेण तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्याss दित्यमभिजयन्ते एतद्वै प्राणानां आयतनमेतदमृतमभयमेतत् परायण मेतस्मान्न पुनरावर्तन्ते ॥ ( प्रश्नो. ९ १० )

-अरण्यादि एकांतस्थळी तप केल्यानें इंद्रियजयाच्या योगानें, ब्रह्मचर्यानें, मोक्ष आणि मोक्षसाधनाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यानें विशेषतः अध्यात्म शास्त्राच्या अभ्यासानें ब्रह्मलोकाची प्राप्ति होते. असे हे आत्मप्राप्तीच्या • मार्गावर असणारे सर्वहि आदित्य लोकास जातात. येथून ब्रह्मलोकाचा मार्ग आहे. अखिल प्राणिजातांना आधारभूत असणारा इतर लोकांच्या मानानें बहुकाल टिकणारा, भयरहित असा हा ब्रह्मलोक ज्यांना प्राप्त होतो, त्यांना पुन्हां जन्मास यावें लागत नाही. ब्रह्मैक्याच्या तीव्र इच्छेनें विरक्त असणारा मरणोत्तर ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो व शिल्लक राहिलेला अभ्यास तिथे पूर्ण करून चतुर्मुख ब्रह्मदेवाबरोबरच कल्पांतीं विदेहमुक्त होतो. सत्य अथवा ब्रह्म लोक ज्ञानप्रधान आहे. तिथे अखंड आत्मविचार चालतो. ब्रह्मदेवाच्या गुरुत्वा खाली व नेतृत्वाखाली चालत असलेला हा ज्ञानप्रधान लोक केवळ मोक्षा साठीच आहे. प्राणाग्निहोत्राचे ” एतद्वै जरामर्यमग्निहोत्र सत्रं य एवं विद्वानु द्गयने प्रमीयते”… पासून…” चे ते ब्रह्मणो महिमानम् ” एथपर्यंतचे मंत्र याच अर्थाचे आहेत.

वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धसत्वाः । 

ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे ॥( म. ना. उ.)

या मंत्राचा भावार्थ वर दिला आहे. हाच विषय मुंडकोपनिषदाच्या द्वितीय मुंडकांतल्या १०-११ व्या मंत्रांत आला आहे. 

तपःश्रद्धे ये हनुपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो मैक्षचर्या चरन्तः । 

सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ||

बृहदारण्यकाच्या सहाव्या अध्यायांतील दुसऱ्या ब्राह्मणांतहि हाच विषय दिसून येतो.

ते य एवमेतद्विदुर्ये चामी अरण्ये श्रद्धा सत्यमुपासते । 

तेऽचिरमिसम्भवन्ति … तेषु ब्रह्मलोकेषु पराः पराक्तो वसन्ति तेषां न पुनरावृत्तिः ॥ १५ ॥

अथ ये यज्ञेन दानेन तपसा लोकाअयन्ति ते धूममाभिसंभवन्ति… एवमेवानुपरिवर्तन्ते ।।

ब्रह्मलोकेषु ” असा इथे बहुवचनी प्रयोग असल्यामुळे वैकुंठ-कैलासादि लोकांचेंहि या ठिकाणी ग्रहण आहे असे वाटतें. छांदोग्याच्या १० व्या अध्यायांतील चतुर्थ खंडांतहि याचे दिग्दर्शन झाले आहे. एते ब्रह्मलोकं ब्रह्मचर्येणानुविन्दान्त। ब्रह्मचर्यानेंच ब्रह्मलोकाची प्राप्ति होते. बृहदारण्यकांत त्या त्या लोकांतून मृत्युलोकीं जन्म घेण्यास येतांना मध्ये कोणते टप्पे लागतात त्याचे विवरण आहे. ( ६/ १६) ओघानेंच इथे ब्रह्मसूत्राच्या चतुर्याध्यायाच्या चतुर्यपादाची विद्वान वाचक मंडळींना आठवण होईल. “ अर्चिरादिना तत्प्रथितेः ।” या सूत्रापासून “ विशेषं च दर्शयति । ” या शेवटच्या १६० व्या सूत्रापर्यंत संबंध या चतुर्थ पादभर या विषयाचीच वाटाघाट आहे. सगुणोपासक विरक्त परोक्षज्ञानी आपल्या उपास्य देवतांच्या लोकांना प्राप्त होऊन तदवसानसमयीं त्या दैवताबरोबर ब्रह्मैक्य पावतात. हें “ कार्यात्यये तदध्यक्षेण सहातः परमभिधानात् । ” या पादाच्या दहाव्या सूत्रांत प्रथित केलें आहे. हिला क्रममुक्ति म्हणतात.

तस्य वा एतस्य पुरुषस्य द्वे एव स्थाने इदं च परलोकस्थानं च । ( शतपथ ब्राह्मण १४-७-१-९)

‘शतपथ ब्राह्मणां’त जीवाला इथलें व परलोकाचें अशी दोन स्थानें आहेत असे सांगितलें आहे. या परलोकांत गंधर्वलोक, पितृलोक, देवलोक, ब्रह्मलोक इत्यादि लोकांचा अंतर्भाव होतो. इहलोक म्हणजे मनुष्यलोक | शतपथ ब्राह्मणा च्या १४-७-१-३५ यांत देवलोकाचें वर्णन आहे,१७ व्यांत गंधर्वलोक, १४-७-१-१९ व्यांत पितृलोक आणि ३-७-१-२५ यांत मनुष्यलोकाचें वर्णन आहे. अथ त्रयोवाव लोका मनुष्यलोकः पितृ लोको देवलोक इति सोऽयं मनुष्यलोकः पुत्रेणैव जय्यो नान्येन कर्मणा । कर्मणा पितृलोको विद्यया देवलोको देवलोको वै लोकाना श्रेष्ठस्तस्माद्यां प्रश सन्ति ॥ ( बा. अ. १ ब्रा. ५)

–मनुष्यलोक, पितृलोक व देवलोक असे तीन लोक आहेत. प्रवृत्ति मार्गाच्या दृष्टीने पुत्रोत्पादनानंतर गृहस्थाश्रम पूर्ण होतो. पारमार्थिक वासना सोडून मनुष्यदेहाच्या अभिमानानें व सामान्यतः कामोपलक्षित पुत्रवासनेनें या मनुष्यलोकाची, मनुष्यदेहाची प्राप्ति होते व पुत्रलाभानें या ठिकाणी सफलता प्राप्त होते. या अर्थी हा मनुष्यलोक पुत्रप्राप्तीनेंच जय म्हणजे पूर्ण होतो असे म्हटले आहे. “ अपुत्रस्य गतिर्नास्ति ” या आधारानें अन्य कोणत्याहि कर्मानें गृहस्थाश्रम पूर्ण होत नाहीं; प्रवृत्तिमार्गाचा मनुष्य पितृऋणां तून मुक्त होत नाहीं. स्वधर्माच्या, स्ववर्णाच्या व अन्य गोत्राच्या. वैदिक विधीला अनुसरून लग्न झालेल्या सुशील अशा सतीस स्त्रपतीपासून झालेला पुत्रच पुत्र म्हणवून घेतो. अशा पुत्रामुळेच गृहस्थाश्रम पूर्ण होतो व हा लोक जिंकला जातो. इष्टापूर्त कमनी, श्राद्धपक्षादिकांनीं भोगप्रधान पितृलोकाची प्राप्ति होते, विरक्तिप्रधान अध्यात्मविद्येच्या अभ्यासानें देवलोकाची म्हणजे ब्रह्मलोकाची प्राप्ति होते. या सर्व लोकांत ब्रह्मलोक श्रेष्ठ असल्यामुळे त्याची प्राप्ति करून देणाऱ्या अध्यात्मविद्येची महती गायिली जाते, असे बृहदारण्यकांत आले आहे.

आयुः पृथिव्यां द्रविणं ब्रह्मवर्चसं मह्यं दत्वा व्रजत ब्रह्मलोकम् ।( १९-७१-१ )

या अथर्वण मंत्रांत ब्रह्मलोकाचा उल्लेख आला आहे. यजुर्वेदीय महानारायण उपनिषदांमध्येहि हा मंत्र थोड्याशा पाठभेदानें आला आहे. त्या त्या देवता हविग्रहणानंतर पुन्हां ब्रह्मलोकास जातात असे यावरून स्पष्ट होते. तद्विष्णोः परमं पदम् । (सामवेद आरार्चिक १८/२/१/५ ) या मंत्रां तहि विष्णुपदाचा उल्लेख आहे; हाच विष्णुलोक. “ ऊर्ध्वो नाकस्याधिरोह विष्टपं स्वर्गो लोक इति यं वदन्ति । ( अथर्व ११-१-७ ) या मंत्रांत स्वर्ग लोकाचा उल्लेख आहे. पितॄणां लोकमपि गच्छन्तु ये मृताः । ( अथर्व. १२-२-४५ ) या मंत्रांत पितृलोकाचा उल्लेख आहे. अनाहुर्नारकं लोकम् । ( १२-४-३६) या मंत्रांत नरकलोकाचा उल्लेख आहे. इदं यमस्य सादनम् । ( ऋग्वेद १०-१३५-७ ) या ऋग्वेदमंत्रांत यमलोकाचें वर्णन आहे. या सर्वांच्या उल्लेखावरून अन्य लोकांच्या अस्तित्वाविषयीं व जीवाला मरणोत्तर प्राप्त होणाऱ्या लोकांविषयीं कोणालाहि विश्वास उत्पन्न होईल असे वाटतें. कर्मा नुसार फल भोगण्यास त्या त्या लोकांना जीवाला जावे लागतें व तें कर्म अनुभवून संपल्यानंतर पुन्हां या अथवा इतर लोकी जन्मास यावे लागतें यावर विश्वास असणाराच आस्तिक. परलोकाच्या ठिकाणीं विश्वास न ठेवणारा आणि परमात्म्याशी ऐक्य प्राप्त होईपर्यंत वासनेप्रमाणें प्राप्त होणाऱ्या पुनर्जन्माविषय विश्वास नसणारा नास्तिक होय. अस्ति नास्ति दिष्टं मतिः । ( पा. सू. ४४ ६० ) अस्ति इत्यस्य मतिरास्तिकः नास्ति इत्यस्य मतिर्नास्तिकः परोलोकोऽस्तीति मतिर्यस्य स आस्तिकः तद्विपरीतो नास्तिकः । परलोक प्रतिपादक अशीं अनेक श्रुतिस्मृतिवाक्ये आहेत. आप्नोति इमं लो आप्नोति अमुम् । ( अ. वे. शौ. सं. ९ ११ १३.) इमं च लोकं परमं लोकम् । ( अ. वे. १९/५४/५.) अयं लोको नास्ति पर इति माना पुनः पुनर्वशमापद्यते मे । ( कठ.) कठोपनिषदाच्या या मंत्रांत ‘ हा एकच लो आहे, इथे खाऊन पिऊन मजा करावी, दुसरा लोक आणि दुसरा जन्म कुठे आहे ? धर्म म्हणजे काय ? त्याची आवश्यकता कुठे आहे?’ असें म्हणण पुनः पुन्हां माझ्या ताब्यांत सांपडतो, असें नचिकेताबरोबर बोलतांना यमधर्म सांगितलें आहे.

परलोकसहायार्थ नित्यं संचिनुयाच्छनैः । 

धर्मेण हि सहायेन तमस्तरति दुस्तरम् ॥ (मनु. ४|२३८)

नामुत्र हि सहायार्थी पिता माता च तिष्ठतः । 

न पुत्रदारा न ज्ञातिः धर्मस्तिष्ठति केवलः || ( ४।२३९)

–उत्तम परलोकप्राप्त्यर्थ धर्मानुष्ठान अत्यवश्य आहे. धर्मा साहाय्यानें ( मनुष्य ) दुस्तर तम ( अज्ञान) सहज तरून जातो. मरणा प्राप्त होणाऱ्या परलोकांतून आईबाप, आप्तेष्ट, बायकामुलें, यांचें साहाय्य होणें शक्य नाहीं. तिथे धर्मच एक उपयोगी पडतो. या स्मृतिवाक्या परलोकाची व धर्माची कल्पना बळावल्याशिवाय राहाणार नाहीं; इहलोकी साह्यकांचें अकिंचित्करत्व सिद्ध झाल्याशिवाय राहाणार नाही.

यस्त्वविज्ञानवान्भवत्यमनस्कः सदाऽशुचिः । 

न स तत्पदमाप्नोति स सारं चाधिगच्छति ॥(कठोप. १।३।७)

यस्तु विज्ञानवान्भवति समनस्कः सदा शुचिः । 

स तु तत्पद्माप्नोति यस्माद्भूयो न जायते ॥८॥

विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः ।

सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम् ॥ ९॥

या कठोपनिषदाच्या मंत्रातून संसार शब्द आला आहे. अज्ञानी, मना धनि व विषयवासनेचा अशुद्ध माणूस मुक्त न होतां जन्मास येतो. ज्ञानी, मनोजयी मात्र, जिथे पोहोचल्यानंतर पुन्हां जन्माला येत नाहीत, त्या पदाला जाऊन पोहोचतो. या पदालाच ‘विष्णुपद’ म्हणतात. हे पुढच्या मंत्रांतून स्पष्ट होतें. ज्ञानविज्ञानसंपन्न, मनोनिग्रही, या संसारमार्गाच्या पैलतीरास म्हणजे त्या परमश्रेष्ठ विष्णुपदास जाऊन पोहोंचतो, असा या मंत्रांचा सामान्य अर्थ आहे. यांत विष्णुपद असा शब्दप्रयोग आहे. ‘विष्णुपद’ या शब्दाचे दोन अर्थ होतील. एक मोक्षरूप ब्रह्मैक्य; हा मोक्ष पूर्ण ब्रह्मनिष्ठांना मिळतो. दुसरा विष्णु लोक म्हणजे वैकुंठ; मुमुक्षुतेच्या व वैराग्याच्या बळानें अपरिपक्क ज्ञान्यांना, पण उत्कृष्ट भक्तांना या लोकाची प्राप्ति होते असे मानावे लागते. यामुळे न तस्य प्राणा उत्क्रामंति क्वचन गच्छति या श्रुतिवाक्याचा सरळ अर्थ लागतो.

स्वर्गकामो ज्योतिष्टोमेन यजेत । स्वर्गाची इच्छा करणाऱ्यांनी ज्योतिष्टोम नांवाचा यज्ञ करावा, इत्यादि श्रुतिवाक्यानेंहि जीवाचे स्वसंकल्पित परलोक गमन व तसेच त्याचें अविनाशित्व सिद्ध होतें. जन्ममरणशील देहाहून हें ‘ चैतन्य ‘ सर्वथैव विलक्षण असून, तें सदाचेंच जन्ममरणरहित आहे, हें युक्तनेहि निश्चित समजून येते. स्वसंकल्पवशाबद्धः निःसंकल्पात्प्रमुच्यते । ‘ तें’ देहादिकाहून वेगळे असूनहि, केवळ त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होणाऱ्या अहंकार- ममकारानें, मी माझे या संकल्पानें तें बद्ध होतें व हा संकल्प नष्ट झाला कीं ‘ तें ’ मुक्त होतें. केवळ चैतन्यरूप असणाऱ्या जीवाला, त्याच्या नुसत्या संकल्पानेंच, देह मी अशा कल्पनेनेंच जन्ममरणादिक, उगीच विना कारण त्याच्या पाठीमागे लागतात. व हाच जेव्हां आत्मनिश्चयानें आपलें देहादि विलक्षण स्वरूप, गमनागमनशून्य, जन्ममरणरहित आहे असें जाणतो व जेव्हां तो निःसंकल्प व निष्काम होतो, त्या वेळी या अध्यासाच्या निवृत्तीनें आपोआपच मुक्त होतो; चिन्मात्र आनंदघन ब्रह्म होतो. मग त्याचें जन्ममरण थांबते, लोकांतरगमन खुंटते; असल्याप्रमाणेच स्वतःस समजून असणे म्हणजेच आत्मज्ञान ‘ व या आत्मज्ञानानेंच मुक्ति लाभते. वेगळ्या देहादिकांच्या ठिकाणी मी, माझें अशी कल्पना उत्पन्न होणें, यालाच अध्यास म्हणतात. यदन्यदन्यत्र विभाव्यते भ्रमादध्यासमित्याहुरमुं विपश्चितः । असर्पभूतेऽ हि विभावनं यथा रज्वादिके तद्वदयीश्वरे जगत् ।। (रा.गी. ३७) वेगळ्या देहादि पदार्थांच्या ठिकाणीं मी, माझें म्हणून भ्रमानें त्वतःची विरुद्ध भावना करून असणें, या आपल्या आनंदघन परमात्म्याच्या ठिकाणीं तद्भिन्न जगाची कल्पना करणें, याचेच नांव अध्यास. या अध्यासाची कल्पना म्हणजे दोरीच्या ठिकाण, तद्विरुद्ध सर्पाची भावना करून घेऊन बसणें होय. याला अविद्याच कारण होते. अनित्याऽशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या । (पा.यो. सू.) अनित्य, अशुद्ध, दुःखरूप आणि अनात्म देहादिकांच्या ठिकाणी नित्य, शुद्ध, सुखरूप अशी जी आत्मभावना उत्पन्न होते, तिलाच ‘ अविद्या ‘ म्हणतात. देहोहमिति या बुद्धिः सैवाविद्योत कथ्यते । देह ‘मी’ म्हणून होणाऱ्या कल्पनेलाच ‘अविद्या’ असे म्हणतात. अनात्मनां देहादी नामात्मवेन यदाभिमन्यते सोऽभिमान आत्मनो बंधः । तन्निवृत्तिर्मोक्षः । या तदभिमानं कारयति सा अविद्या । सोऽभिमानो यथा निवर्तते सा विद्या । (सर्वसार उ.) अनात्मरूप असणाऱ्या देहादिकांच्या ठिकाणी ‘मी ‘ हा मिथ्या अभिमान जेव्हां उत्पन्न होतो, तेव्हां जीव ‘ बद्ध ‘ म्हणवून घेतो. तो मिथ्या अभिमानच त्याचा बंध; याची संपूर्ण निवृत्तीच मोक्ष. जी कल्पना तसा अभिमान उत्पन्न करते तीच अविद्या व ज्या आत्मीय भावनेनें हिची अत्यंत निवृत्ती होते ती विद्या.

home-last-sec-img