Literature

ब्राह्मणांना समर्थांचा उपदेश

उंच झाडांना वारा अधिक लागतो हे जाणून उच्च वर्णाच्या ब्राह्मणांनी आपले रक्षण करून घ्यावयाला पाहिजे. डोक्यावर पाणी घातले की सर्व अंगावर पायापर्यंत पढते. मुळाला पाणी घातले की सर्व शाखोपशाखांच्या पानोपानी जाऊन पोहोचते. हे जाणून ब्राह्मणांनी व समाजानें आपलें रक्षण करावे. अलीकडच्या इतक्या अधोगतीच्या काळाला ब्राह्मणांची अधोगतीच कारणीभूत झाली आहे हे विसरून भागत नाही. संस्कृति नष्ट होऊं नये म्हणून जसे आर्यांनी बियांचे रक्षण केले त्याप्रमाणे नियम घालून देऊन ब्राह्मणांचेहि रक्षण केलें.

” ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें। ब्राह्मण सकळ तीर्थाटणें ॥ कर्ममार्ग ब्राह्मणाविणं । होणार नाहीं ॥ ” ( दासबोध ५-१-११). आतां असे काही नाही. कोणत्या वर्णाचींहि वधू जशी केली जाते त्याप्रमाणेच कोणत्याहि वर्णातून आतां ब्राह्मण व्हावयाला लागले आहेत. “ सकळांसी पूज्य ब्राह्मण । हें मुख्य वेदाज्ञा प्रमाण ॥ वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥१०॥ ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत || पूर्ण होती मनोरथ । प्रिग्रबाक्ये करूनी ॥ १२ ॥ ब्राह्मणपूजनें शुद्धवृत्ति होवोनि जडे भगवंतीं ॥ ब्राह्मणतीर्थं उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३ ॥ असो जे हरिहरदास । तयांस ब्राह्मण विश्वास ।। ब्राह्मणभजनें बहुतांस | पावन केलें ॥ १४ ॥” समयानी काय इतरत्र काय ब्राह्मणाचे वर्णन किती केलें आहे. अलीकडच्या ब्राह्मणांनी या कीर्तीला योग्य व्हावयाला नको काय? ” आर्ची राखावा आचार | मग पाहावा विचार || आचारविचारें पैलपार पाविजे तो ॥ (दा. बो. १७-१० -१५ ) हैं लक्षांत ठेवावयाला नको का ? अग्रतश्चतुरो वेदान पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।। अशी ही स्थिति असती तर ब्राह्मणांची हल्लींची दैना झाली असती का? अग्नीला चेष्टेनें कोण शिवेल ? शिवेल त्याला त्याच्या तेजस्वितेची जाणीव होणार नाही का ? ” हे सर्व आपणांचिपाशी ” असे यानें नाहीं का सिद्ध होत ? “ अंतर्निष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ॥ ” असे अजूनहि नाहीं का दिसून येत ? “ बाह्याकारें भरंगळले | लोकाचारें |” ब्राह्मणांच्या ठिकाणीहि असे कां दिसून यावें ? ” देह परमार्थी लाविलें । तरीच याचे सार्थक झाले नाहीतरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें । ” ( दा. बो. १-१०-११) हें खोटें का ? ” बहुत जनासी चालवी । नाना मंडळे हालवी ॥ ऐसी हे समर्थ पदवी। विवेकें होतें ।। (दा.बो.१८-१०-४६) हें खरें ना! “हे सर्वहि आपणांचिपाशी । येथे नाहीं जनांसी आपण वचनें बोलावीं जैसी । तैसी येती पडसादें ॥” हें अजून कां पहूं नये? “तया देहामध्ये नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो॥ तया ब्राह्मणदेहासी पाहो । अधिकार वेदीं ॥ ” ( दा. बो. १०-२-१७) देवानें दिलें आणि कर्मानें नेलें असें कां होऊं द्यावें? “जेथें षट्कर्मे चालती । विध्युक्त त्रिया आचरती । वाग्माधुर्ये बोलती । प्राणिमात्रासी ॥ (दा. बो. १४-७-५)

सर्व प्रकारें नेमक । शास्त्रोक्त करणें कांहीं एक || त्यांहीमध्ये अलोलिक | तो हा भक्तिमार्ग || ६ || पुरश्चरणी कायाक्केशी । दृढवती परमसायासी । जगदीशा वेगळें जयासी | थोर नाहीं ||७|| कायावाचा जीवेंप्राणें । कष्टे भगवंताकारणें ॥ मनें घेतलें धरणें । भजनमार्गी ॥ ८ ॥ अंतरापासूनि वैराग्य । तोच जाणावें महद्भाग्य ॥ लोलंगतेएवढे अभाग्य । आणीक नाहीं ॥ १० ॥ ऐसी वृत्ति उदासीन । त्याहीवरी विशेष आत्मज्ञान | दर्शनमात्रे समाधान | पावती लोक ॥ १३ ॥ बहुतांस करी उपाये। तो जनाच्या वांट्या न ये || अखंड जयाचें हृदये | भगवद्रूप || १४ ||” असे असायला पाहिजे की नाही? “ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचाराचे बुडाला || वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण से ॥ २९ ॥” असें हें आतां झालें आहे खरें, पण हें “ब्राह्मण बुद्धीपासून चैवले । आचारापासून भ्रष्टले ॥ गुरुत्व सांडूनि झाले शिष्य शिष्यांचे ॥ ३१ ॥ ” असे झाल्यामुळेच ना ? आतांच्या बहुजन ब्राह्मणांची स्थिती बघितली म्हणजे इतके झाले तरी अजून “ हे ब्राह्मणांस कळेना त्यांची वृत्तीच बळेना ॥ मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥ ” असे आढळून आल्यानंतर कोणाच्या अंतःकरणाला पीळ पडणार नाही ? “ आतांचे ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें ॥ तुम्हां बहुतांच्या प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला । आतां तरी ब्राह्मणी आपणाला । शाहर्णे करावें ॥ १४-८-१॥ देव पुजावा विमळहस्ती । तेणें भाग्य पाविजेल समस्ती । मूर्ख अभक्त व्यस्तीं । दरिद्र मोगिजे ॥ २ ॥ जगदांतरें वोळला धणी किती एकवटील प्राणी ॥ परी ते बोळयाची करणी । आपणापासी ॥ १४ ॥ सर्व साभिमान सांडावा प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकवळे || ४९ ॥ करिती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण | ब्रह्मविद || ( ६-४ २४) असें ब्राह्मण सर्वांनी व्हावे.

home-last-sec-img