Literature

ब्राह्मोपदेश

मनुष्याने आपल्या जन्माचे सार्थक करण्यासाठी मंगलमय नित्यानंदस्वरूपी परमपवित्र परमानंदरूपी असलेल्या सच्चिदानंदरूपी परमात्म्याला जाणून घेतले पाहिजे, त्याचे ज्ञान झाले पाहिजे, त्याला जाणले पाहिजे. तो सर्व जीवांचे सत्यस्वरूप असल्यामुळे सर्वांशी एक्यभावनेने जीवन पार पाडणे हेच मुख्य कर्तव्य ! त्यांतच जीवनाची सार्थकता! परमात्म्याची प्राप्ति हेच मानवाचे मुख्य ध्येय !!

आज बटू यांना संस्कार झाला आहे. संस्कारात द्विज उच्यते।’ संस्कारानेच द्विजत्व प्राप्त होते. संस्कार होत नाहीत तों पावेतों तो शद्र, ‘जन्मना जायते शूद्रः।’ संस्कार झाल्यानेच त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. वेदमंत्रासाठी वेदानुष्ठानासाठी व क्रियांगासहि तो पात्र होतो. वेदाध्यायाद्भवेद्विप्रः।’ आणि त्यानंतर वेदाध्ययन करण्याने विप्र म्हणविला जातो ‘ब्राह्मणो वेदपारंगः ।’ वेदांचे रहस्य ओळखून तें मनात बाळगून, अंगिकारून वेदसामर्थ्य प्राप्त झाल्यावरच त्यास ब्राह्मण’ म्हटले जाते. ब्रह्म जानातीति ब्राह्मणः ।’ ब्रह्माला ओळखणारा, म्हणजेच सच्चिदानंदस्वरूपी परमात्म्याच्या निजस्वरुपाला जाणून त्याचा आनंद अनुभवणाराच ब्राह्मण. ज्योतिस्वरुप, स्वयंप्रकाशी, परमपवित्र, परिशुद्ध, दिव्य आनंदस्वरुपच परमात्म्यांचें स्वरूप. त्याचे वर्णन करणे श्रुतीनाहि साध्य झाले नाही, जे डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, मुखाने वर्णन करता येत नाही अशा त्या अपार महिमासंपन्न दिव्य रूपाची प्राप्ति करून घेतली पाहिजे. तीच सर्व जीवांच्या सुखांची शेवटची पायरी होय. त्या अतिमहान दिव्य पदवीस पोहोचण्यासाठीच हे संस्कार आहेत. असे संस्कार आपण सर्वांनी प्राप्त केले आहेत किंवा आपल्या मुलांना आपण करून दिले आहेत.

अनुवंशिकतेने आलेली कर्म, पावित्र्य, उज्वलता पुन्हा उजळविण्यासाठी, पुन्हा वाढविण्यासाठी, ऋषिमुनींचे वंशज म्हणून ओळखण्यासाठीच हे संस्कार केले जातात. वेदाध्ययन केले जातात. वेदाध्ययन करून त्यांचे ज्ञान प्राप्त होते त्यालाच वेद म्हणतात. वेद ही परमात्म्याची वाणी! वेदोच्चारांत अतीव सामर्थ्य आहे. आपल्या धर्माला ‘वेदधर्म’ असेच नांव आहे. आर्यधर्म, सनातन धर्म असहि नांव आहे. जगाच्या अभ्युदयाकरता, जगाच्या श्रेयसासाठी, जगाच्या कल्याणासाठी सर्वांच्या इहपर उन्नतीसाठी सुलभ उपाय वेदधर्मात आहे. त्याच्या अनुष्ठानांचा अधिकार पावलेल्या बटू यांनी साफल्यता प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गायत्री’ ही वेदमाता म्हणविली जाते. ‘स्तुता मया वेदमाता’ असें जे म्हटले जाते त्याद्वारे गायत्री परमात्म्याच्या आनंदाची महानताच व्यक्त होते. ‘गायत त्रायते यस्मात ।। ‘तुला गाणाऱ्याला वाहावा करून स्तुती करणाऱ्यास तूं खरोखर उद्धरतेस, तसें सामर्थ्य तुझ्यात असल्यामुळे तुझी आराधना करतो. असेच ह्यांचे तात्पर्य.

सन्ध्यां नोपासते यस्तु ब्राह्मणो न भवेत् । अहरहस्त्रन्ध्यामुपासीत।’ जो संध्यावंदन करीत नाही तो ब्राह्मण होत नाही. त्याची ब्राह्मणांत गणना होत नाही. दररोज संध्या केलीच पाहिजे अशी श्रुतींची आज्ञा आहे. ‘इवन्नैव शूद्रस्यात् मृतोश्वाचैव जायते।’ जो संध्योपासना करीत नाही तो शूद्र म्हणवला जातो; इतकेच नव्हे तर मरणोत्तर कुत्र्याचा जन्म त्यास प्राप्त होतो. पहा केवढी त्याची अधोगति होते ती!’

गायत्री अनुष्ठानाने पतीतहि पावन होतो व उन्नत पदवी प्राप्त करून घेतो. नाही तर अवनतीच दिसून येणार ! आजकालच्या अवनतीला हेच कारण आहे. ब्राह्मणत्वाचे सामर्थ्य फार मोठे आहे. ते स्वसाधनेंत निरत झाले तर नवीन सष्टीसुद्धा निर्माण करू शकता. विश्वामित्रानें गायत्री अनुष्ठानाच्या बळावर विचित्र सृष्टीच निन केली होती. वसिष्ठादि अनेकानेक ऋषिमनी आपल्या अनंत सामर्थ्याने विश्वपावन विभूति होऊन जगले. अशा परमपुज्य पावन अशा महर्षि यांचे पुत्र तुम्ही. तुम्ही त्यांचे वंशज ! तुम्ही आपले जीवन दिव्य, बनविण्यासाठी त्यांचे अनुकरण करावयास हवे! त्यांच्या अवलंब करण्यानेच अलिकडची अवनति नाहिशी होईल, उजळवून अचल निष्ठेच्या मार्गाने ह्या जन्मीच कृतार्थ व्हाल.

ॐ’ कार हा परमात्म्याच्या सत्यस्वरूपाचा निदर्शक होय. हा सृष्टीचा जीव आहे. त्याची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत. सगुणरूपांत सष्टिकर्ता होऊन, निर्गुणतेने जगाचा अधिष्ठानरूपी होऊन तो राहतो. ही दोन्ही रूपें प्रणवानेच सूचित झाली आहेत ही मुख्य गोष्ट होय. पथमतः परमात्म्यात ‘ अहं ब्रह्मास्मि’ असें जे आत्मस्फुरण झालें तोच प्रणव ! गायत्रीहीहि प्रणव स्वरूपच. प्रतिमंत्राचे स्वरूपहि प्रणवाचंच होय. सर्व देवतांचे स्वरूपहि प्रणव स्वरूपच. प्रत्येक मंत्राच्या सुरवातीला ‘ॐ’ असा उच्चार केला जातो तेंच परब्रह्मस्वरूप. तेंच एकाक्षरब्रह्म! !

‘भूः भुवः सुवः’ ‘भूः’ हे केवळ सत्तास्वरूप असल्यामुळेच अद्वितीय आनंदाच्या अपार वैभवाने ज्ञानरूप होऊन आपणच आपण होऊन राहाते. ‘भूः भुवः सुवः’ असे म्हणणे सत्, चित् आनंदाचेच द्योतक होय. सच्चिदानंदपदाच्या उत्पत्तिलाहि तेच मूळ कारण होय. ‘सूयते अनेनेति सविता ।’ जगाला कारण झालेले, हेच ‘सविता’ ह्या शब्दानें स्पष्ट होते. ‘वरेण्यं’ इतर सर्व महात्म्यापेक्षा अधिक, सर्वश्रेष्ठ असून पूर्णत्व पावलेले होय. ‘एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्च पुरुषः। ‘ अपार वैचित्र्यपूर्ण शक्त्तिसामर्थ्य असणारा, अपार कीतीने, महिन्याने परिपूर्ण असे सामर्थ्य असणारा, अनंत वैभवाने समृद्ध होऊन आवंद सुखसाम्राज्याने तळपणारा अशी परमात्म्याची श्रेष्ठता ‘वरेण्यं’ हा शब्द दर्शवितो त्या परमात्म्याचा आनंदच सर्वश्रेष्ठ आनंद होय हे पटल्यानंतर ह्या जगातील सर्वांनी आपापले जीवन पार पाडण्यासाठी त्याची प्राप्ति करून घेतलीच पाहिजे. त्यामुळे अचल समाधान प्राप्त होते. अनित्यमसुखं लोकं इमं प्राप्य परांगतिम् ।’ दुःख सागराला बाजूला करून आनंदाच्या उन्नत पदवीची प्राप्ति करून धन्य झाले पाहिजे. ‘वरेण्यं ‘ हे पद उन्नत पदवीचे महत्त्व सूचित करते.

भर्गः’ म्हणजे ‘भर्जयतीति भर्गः । अज्ञानाचा नाश करणार विघ्नांचा परिहार करणारा, भय-भीति, दुःख शोक ह्यांचे निर्मल करणारा, त्यांना नाहिसा करणारा असा ‘भर्ग’ शब्दाचा अर्थ और थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अज्ञानाचा समूळ नाश करणारा असाच ह्याचा अर्थ. त्यामुळे सर्व चिंता भय सोडून त्याची आराधना करीत राहिल्यास सर्व दुःखशोकांना तोंड देता येऊन ती सर्व नष्ट होतात: शांतिसमाधानाची प्राप्ति होते; तो सामर्थ्यसंपन्न होतो व मनात केलेले संकल्प पूर्ण होतात.

‘देवस्य धी महि’ दीव्यत इति देवः’ स्वतः प्रकाशमान असणायलाच, पूर्ण चैतन्य असणाऱ्यालाच ‘देव’ असे म्हटले जाते. प्रकाश असलेल्या ठिकाणी अंधारास जागा नसते. म्हणूनच स्वयंप्रकाशी महाचैतन्याचे ध्यान केले पाहिजे; सर्वांच्या देहांना चैतन्य देणाऱ्या महाशक्तीला ओळखले पाहिजे. सहजरित्या अनुष्ठानानेच कार्यसिद्धीला जाईल. पण दुष्ट गणांच्या दुष्ट शक्तीची बाधा होऊ नये म्हणून आवरण-विक्षेपाचे निवारण व्हावे. ‘धी महि’ बुद्धीनेच सर्वकाही समजते. ‘मी’ ही जाणीव समजवूनच पटवून घ्यावी लागते. त्या जाणिवेच्या द्वारेच निरतिशय आनंदाचा अनुभव होतो. त्यामुळे त्या अपार सुखाच्या पवित्र भावना ‘मी’ ह्या जाणिवेत उजळू देत, अशी प्रार्थना केली आहे.

ठीक आहे. आजच्या ह्या संस्काराद्वारे तुम्हां सर्वामध्ये दिव्यज्ञान । स्फुरण पावो ! तुम्ही सर्व कृतकृत्य व्हा ! परमात्म्याच्या दिव्यकृपेला पात्र होऊन पवित्रतेने तुमचे जीवन सार्थक होवो!

आता ह्या सर्व बटूंना वेद शिकविले पाहिजेत म्हणन ह्या बटूच्या पालकांनी त्यांच्याकडून वेदाभ्यास करविणे योग्य होईल.

home-last-sec-img