Literature

भगवंताचा प्रिय भक्त मुमुक्षु

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥ 

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ||१४|| (भ.गी. अ. १२)

दयापर, – सर्व भूतांच्या ठिकाण द्वेषरहित असल्यामुळे जो लोकमित्र सर्व निर्मम, निरहंकार, सुखदुःखसम, सहनशील, क्षमाशील, अल्पसंतोषी, सतत समाधानी असतो, स्वरूपांत विरून जो जितेंद्रिय, दृढनिश्चयी आणि माझ्या ( परमात्म्याच्या ) ठिकाणी जो मनबुद्धि ठेवून वागतो, अनन्य भक्तीने असतो असा योगीच मला प्रिय होय. असें भगवंताचें म्हणणे आहे.

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ||१५||

– जो लोकांना विटत नाहीं व ज्याला लोक विटत नाहीत असा हर्षशोक, कामक्रोध, उद्वेगचिंता यांनी रहित असणारा माझा भक्तच मला प्रिय असतो.

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौतेय न तेषु रमते बुधः ।। (भ.गी. ५/२२)

बाह्य पदार्थांच्या संयोगानें इंद्रियांना होणारी भोगसुखें म्हणजे केवळ दुःखाच्या खाणीच होत. हीं वैषयिक सुखें उत्पत्ति व नाश यांनी युक्त आहेत. बुद्धिमान अशा विकारी सुखांत कधीं रमत नाहीं. आत्मसुखाची आकांक्षा बाळगणारा मुमुक्षु असल्या, विजेप्रमाणे क्षणभंगुर असणाऱ्या, भ्रामक विषयसुखाच्या ठिकाणीं कधींहि रममाण होऊं नये. तो विरक्त असावा. असला विरक्तच देहाभिमानाच्या मगरमिठीतून मुक्त होतो. दैहिक सुखाची कल्पना ज्याला शिवत नाहीं तोच विवेकी. दैहिक सुखाची कल्पनाच ज्याला नसते तो बुद्धिमान देह व तत्संबंधी विषयजालांत ज्याचे ‘अहं’कार ‘मम कार पूर्ण नष्ट झाले आहेत तोच ज्ञानी. आत्मानंदानें जो संतृप्त असतो तोच त्यागी. अखिल विश्वांत याला परिशुद्ध आनंदाचा आत्मभाव असतो. याला सर्व · भूतहिताची दृष्टि असते. आर्य संस्कृतींत विश्वात्मता आहे, आनंदघन परमात्मैक्य आहे, त्या स्वरूपभूत अनंत आनंदाचा आचार, विचार व प्रचार आहे. आर्य संस्कृतींत दुःखाचा मागमूस नाहीं, भेदाचा वारा नाहीं, स्वार्थाचा प्रवेश नाहीं, वैयक्तिक सुखाचा गंध नाहीं. यांत प्राणिमात्राच्या सुखाची इच्छा आहे, प्राणिमात्राच्या उद्धाराचा संकल्प आहे, प्राणिमात्राच्या दुःखनिवृत्तीचें दिव्य जीवन आहे, दुःखसंतप्तांचीं दुःखें घालविण्याचें गोड आचरण आहे.

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गे नापुनर्भवम् । कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥

–मी राज्याची अपेक्षा करीत नाहीं; स्वर्गाची इच्छा बाळगीत नाहीं मोक्षाचीहि पण मला अभिलाषा नाही. पण हताश अशा त्या दुःखी कष्टी जीबांचे ते दुःखकष्ट नष्ट करावेत हेंच माझें एक इष्ट आहे. त्याकरितां स्वतःला मी ब्राहून घेतले आहे. यांतच माझें सारसुख आहे. असे रंतिदेवाचे प्रेममधु उद्गार आहेत. आर्य संस्कृतीच्या भूतदयेचें व समत्वाचें हें एक उदाहरण आहे ही आर्य संस्कृतीचीं अथवा वैदिक संस्कृतीची ब्रीदवाक्यें आहेत.

home-last-sec-img