Literature

भरताचा प्रश्न

अथ क्लेशजमेव त्वं धर्मे चरितुमिच्छासि । 

धर्मेण चतुरो वर्णान् पालयन क्लेशमाप्नुहि २१

( वा. रा. अयो. १०६ )

– प्रभो श्रीरामा ! कष्टप्रद धर्माचे पालन करावें म्हणून अशा अरण्यांत तूं राहिला असल्यास धर्मपालनांतल्या कष्टाची तुला इतकी आवड असल्यास इतक्याच कष्टानें पाळला जाणारा दुसरा एक धर्म आहे. राज्यांत राहून सुद्धां तुला इतक्याच कष्टानें त्याचे पालन करता येईल. अरण्यवास करूनच असे कष्ट भोगले पाहिजेत असें नाहीं. धर्माप्रमाणें ब्राह्मणादि चारी वर्णांचें परिपालन करावयाचे म्हटले तरी इतकेच कष्ट होतात. अयोध्येला येऊन चातुर्वणांचें परिपालन कर. तिथे आल्याने हे इतके कष्ट नाहीसे होतील ही शंका नको.

home-last-sec-img