Literature

भरताच्या योगक्षेमाची चौकशी

प्रथम भेटीच्या वेळी उद्भवलेली ती उद्दाम प्रेमाची अनावर लाट थोडी शांत होऊन चित्ताच्या समपातळीवर आल्यानंतर श्रीरामानें भरताच्या योग क्षेमाची चौकशी करण्यास सुरुवात केली. बरेच लोक आहेत. एकूण सर्व मिळून सत्तर इतकी या श्लोकांची संख्या भरेल. यांत सर्व काही सांठविलें आहे. यांत राजकारणाचे, धर्मकारणाचे, व्यवहाराचे, परमार्याचे तसेच वैयक्तिक धर्माचे व सामाजिक व्यवस्थेचे घडे आहेत. स्वराज्याचे रामराज्य करूं पाहाणाऱ्या आम्हांला यांत सारेंच शिकण्यासारखे आहे. नुसत्या कांड-सर्गाचा व लागल्यास श्लोकसंख्यांचा उल्लेख करून मोकळे व्हावे असे विस्तारभयान मनांत आले तरी ते सर्व शोधून, वाचून त्यावर विचार करणाऱ्यांची संख्या फारच कमी हा विचार येऊन त्यांच्याकरितां कांहीं श्लोक देऊन त्यावर अस स्वल्प विचार करावा व याचे बळेच बाळकडू पाजावें असें बाटतें. महवाढीस लागून अधिक विस्तारहि होतो. द्विरुक्तीहि होते. हें सारें खरे असले तरी हें अमृताचें भोजन आहे. अनेक वेळा अधिक प्रमाणांत अमृत पोटांत गेले तर काय बिघडतें ? यथेच्छ पान करूं या.

श्रीरामानें आपल्या प्रिय भरताकडे बघितलें. छत्रचामरादि कांहीं दिसून आले नाहीं. अशुभ ओढवल्याची कल्पना आली. कसला तरी अपघात झाला असावा असे वाटले. कोणत्या अपघातामुळे हे असे झालें हें भरताच्या तोंडूनच उलगडून घेण्याकरितां ज्याच्यामुळे राजांना अपघात होतो, ती सर्व कारणे एकेक अशीं पुढें ठेऊन प्रश्न विचारण्यांत आले आहेत. कच्चिद्धारयते तात राजा यत्त्वमिहागतः । कच्चिन्न दीनः सहसा राजा लोकान्तरं गतः ॥च

सर्वप्रथम राजा दशरथाच्या क्षेमसमाचाराविषयींची विचारणा केली.. नंतर कोणी राज्य बळकावले का म्हणून विचारलें. पित्याचा कोप होऊन असें कांहीं झालें नसेल ना म्हणून पित्याची शुश्रूषा उत्तम प्रकारे करतोस ना म्हणून विचारपूस केली. अधर्मयुद्धानें व अधर्माचरणानें राज्य नष्ट होते तेव्हां असें कांहीं झालें नसावेंना म्हणून राजा दशरथाविषयी ‘ सत्यसंगरः’

धर्मनिश्चयः या दोन विशेषणांनी चौकशी केली. कौसल्यादि आयांची.चौकशी केली. त्यांचे कुशल विचारले. पुरोहित व तपुत्रादिकांचीहि चौकशी झाली. अग्नी

‘ची चौकशी झाली. मग ‘कच्चिद देवान् पितॄन् घातून…’ या अनुमान विचारावयास सुरुवात केली. वडिलांच्या चौकशीचा ६ वा लोक आहे. इथून जी ‘कच्चित् ‘ म्हणून प्रश्न विचारावयाला सुरुवात झाली ती कच्चित्स्वादुकृतं भोज्यमेको नान्नासि राघव । कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यः संप्रयच्छसि” या ७५ व्या लोकापर्यंत येऊन ठेपली. हे ७० लोकहि देण्यासारखेच आहेत. मूळावरून याचा विचार प्रत्येकाने करावा. कांही या ठिकाणी उद्धृत करून त्यावर विचार करू.

कच्चिद्देवान्पितॄन्भृत्यान्गुरून्पितृसमानपि

वृद्धांश्च तात वैद्यांश्च ब्राह्मणांश्चाभिमन्यसे ॥१३॥ (पा. रा. अ. स. १०८)

बाळ भरता। देवांविषयी गुरुजनांविषयी पितरांविषयी पितरामान पुज्य जनांविषयी, ब्राह्मणांविषयी वृद्धांविषयी, वैद्यांविषयी परिजनांविषयी प्रेमादराने वागून त्यांच्या विश्वासास पात्र झाला आहेस ना ! यांच्या उगानें अवमानाने अपाय पोहोचतो. या लोकांत अगदी प्रथम देवांविषयीची पृच्छा आढळून येते. याचा विचार करण्यासारखा आहे. देवस्थानांचा जीर्णोद्धार करणे, तेथील नैयादि व्यवस्थित चालतात का नाही हे पाहाणे, विध्युक्त पूजादि आराधना होते की नाही हे पाहाणे, अर्थक योग्य आहेत किंवा नाहीत हे पाहाणे, देवस्थानांचे सर्वतोपरी पावित्र्य राखणे, देवस्थानांचे उत्पन्न कमी न करणे, देवस्वाचा अपहार न करणें, आपआपला कुळधर्म कुळाचार चालविणें ही सर्व देवता कार्य होत. याशिवाय यज्ञादिकांनी देवांना संतुष्ट करणे, नित्य वैश्वदेव करणे हे हि देवकार्यात मोडतें तस्मार्त कर्मानुष्ठानें चालविणे, षोडषोपचाराने पूजा करणे इत्यादिकांनी देवताप्ति होते. श्राद्धपक्ष, पितृतर्पण, दानधर्म इत्यादि पितृकार्य म्हणवून घेते. यांनी पितृवर्ग तृप्त होतो. अतिथि सेवा करणे, असहाय दीनदुबळ्यांची सोय करणे, सेत-साधु-हानिष्ठांची शुश्रूषा करणे, योग्य गृहस्पधर्म पाळणे इत्यादि ही कायें पितृतिकर होतात. पाण पोई, अन लोकोपयोगी धर्मशाळादि ही कार्येसुद्धां पितृवर्गाला संतोष उत्पन्न करतात. अध्ययन, सदाचरण, विरक्ति, आत्मविचार, निर्विकारता, आत्मनिष्ठा इत्यादिकांनी श्रीगुरु प्रसन्न होतात. श्रीगुरूच्या आश्रमांची, तेथील परिजनांची, शिष्यांची, विद्याय्यांची व तेथे आल्यागेल्यांची व्यवस्था राखणे, तेयल्या गोधनाची जोपासना करणें, लाभल्यास जवळ राहून त्यांची प्रत्यक्ष सेवा करणें, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेऊन साधन करणे इत्यादि श्रीगुरुसंतोषकारक होतात. पितृसमान पूज्यजनांची आज्ञा पाळणे केलेल्या हितोपदेशाचें आस्थेनें श्रवण करून तदनुसार आचरण ठेवणे, त्यांची सेवा शुश्रूषा करणें, नांवलौकिक संपादणे इत्यादि कार्यांनी ते संतुष्ट होतात. चुलते व तत्समान वृद्धजन पितापितृत्र्यांचे इष्टमित्र यांच्या ठिकाणी आदरबुद्धि ठेऊन त्यांच्या आज्ञेत असणे, तदुपदेशाचे पालन करणें, आजारपणी व त्यांच्या कष्टकार्ली शक्यतों त्यांची शुश्रूषा करणें, वृद्धाप्यकाळी त्यांचा हितोपदेश ऐकार्णे इत्यादिकांनीं ते संतुष्ट होतात. वृद्धांची नित्यच सेवा करणे अथवा करविगें, सर्व वृद्धांशींच विनयानें वागणे, त्यांना प्रेमादरानें बागविणें, त्यांच्या आशीर्वादास पात्र होर्णे हा श्रेयोमार्ग आहे. वैद्यांना योग्य वर्षासन ठेवणे, त्यांच्या श्रमायोग्य द्रव्य देणें, लग्नमुहूर्ती विशेष आहेरादिकांनी द्रव्यसाहाय्याने त्यांना संतुष्ट राखणे, गौरवानें वागविणे, त्यांच्या श्रमाचे चीज करणे इत्यादिकांच्या योगें वैद्य संतुष्ट होतात. वैद्य, स्वयंपाकी चाकर नोकर यांच्याशी वितुष्ट पत्करले तर वेळी प्राणालाच अपाय होण्याचा संभव असतो. त्यांना सदाच संतुष्ट ठेवावें. ते सर्वहि विश्वासास पात्र असावेत. सत्पात्र सदाचारी ब्राह्मणांना दान दक्षिणेनें संतुष्ट राखावें. त्यांचे व विद्यार्थ्यांचे जीवन सुखानें व्यतीत होईल अशी द्रव्य, भूमि, गोदान यांनी व्यवस्था करावी. अग्रहार नेमावेत. त्यांना अन्न वस्त्राची उणीव न भासतां, सुखानें अध्ययन अध्यापनादि तपांत त्यांचा काळ जाईल असें करावें. यज्ञयागादि व इतर अनुष्ठानें त्यांच्याकडून करवून यथोक्त दानमानांनी त्यांना तृप्त करावें. त्यांच्या शापानुग्रह-सामर्थ्याकडे लक्ष देऊन कोणत्याहि प्रकारें त्यांच्या मनस्तापाला बळी पडूं नये; व ब्रह्मत्वाचा अपहार करूं नये. गोब्राह्मणांचें सदैव संगोपन करीत असावें.

home-last-sec-img