Literature

भरताला श्रीरामाचा उपदेश

तमेवं दुःखितं प्रेक्ष  भरताला दुःखित पाहून श्रीरामानें त्याच्या दुःखपरिहारार्थ केलेला हा उपदेश आतां आपण पाहूं. दुःखाचें सांत्वन करणारी ही वाक्य ऐकून त्यावर विचार करून आपली दुःखेंहि हलकी होतील यांत संदेह नाही.

मनुष्य हा अस्वतंत्र आहे – 

नात्मनः कामकारोऽस्ति पुरुषोऽयमनीश्वरः । 

इतश्चेतरतश्चैनं कृतान्तः परिकर्षति ॥ १५ ॥( वा. रा. अ. स. १०५ )

भरता ! उगीच खिन्न होऊं नकोस. माझ्या वनवासाला कारण जननी कैकेयीहि नव्हे किंवा वडील दशरथ महाराजहि नव्हेत योगायोग हाच एक कारण आहे. भवितव्यं भवत्येव नारिकेलफलांबुवत् । गंतव्यं गच्छति सदा गजभुक्तकपित्थवत् ।। योगायोग कोणाला तरी पुढे करून आपले कार्य साधतो. हरएक प्रयत्नानें आपल्याला अनुकूल असे वातावरण तो निर्माण करतो. या योगायोगालाच ईशसंकल्प भवितव्स दैव  प्रारब्ध इत्यादि नांवें आहेत. प्रत्येकालाच यांतून जावे लागते. याच्याकडे लक्ष न देतां स्वतंत्रतेनें मनाला येईल तसे वागूं म्हटले तर ते कोणासहि शक्य होत नाही. ही भवितव्यता आपल्याला पाहिजे तसे मना ला प्रेरते आणि पालटून टाकते. मनुष्याच्या ऐहिक जीवनांत एकदम येऊन आदळणाऱ्या सुखदुःखांना व हानिलाभांना हेच कारण आहे. तूं आईवर रागावूं नकोस. मी योगायोगा संबंधी जे आत्तां सांगितलें तें लक्षांत घेऊन तूं दुःख करूं नकोस. मनुष्याला स्वातंत्र्य असतें तर त्याच्या इच्छेप्रमाणें सारें होतें. होत नाही म्हणूनच त्याला अस्वतंत्र म्हणावें लागतें. या श्लोकांत  कामकार: म्हणजे इच्छेप्रमाणे करणे अनीश्वरः म्हणजे अस्वतंत्र आत्मा म्हणजे याठिकाणी देहधारी आणि कृतान्तः  म्हणजे दैव अथवा भवितव्य म्हणून समजलें पाहिजे. कोणत्या देहधान्यास इच्छेप्रमाणे सर्व कांहीं करण्याचे स्वातंत्र्य नाही. भवितव्यता त्याला आपल्या कलाप्रमाणे नाचविते. भवितव्यतेप्रमाणे त्याला बुद्धि सुचते. सर्वांचे जीवन ईशसंकल्पाच्या अथवा भवितव्यतेच्या आधीन आहे. हा या उपरिनिर्दिष्ट श्लोकाचा अर्थ.

सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः । संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् १६

( वा. रा. अ. कां. स. १०५)

नाशावधि सर्व पदार्थ असतात. एकहि जगांतलें शाश्वत नाहीं कष्टाने मिळविलेलें द्रव्य त्याची अवधि संपतांच अकस्मात नाहींसें होते ( चञ्जला चपला लक्ष्मीः ।) प्रयत्नानें किती उच्च पद मिळवो पतनावधि असतें

नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वे मंलोकं हीनतरं वा विशन्ति

( मुं. उप २ – १०)

कितीहि उन्नतपद प्राप्त झाले तरी ते नाश होईपर्यंतच अस्तित्वात असले कर्म करून जसे नष्ट होतें व्याप्रमाणेच कर्मफल भोगून नष्ट होते. कर्मफलरूप लोकांतराची प्राप्तिहि तोपर्यंतच असते. लोकांत मिळून असण्याचाहि एक काळ असतो. वियोग होण्याचा काल आला म्हणजे पिता-पुत्र आई-मुलगा – पति  इष्ट-मित्र आपोआप दूर होतात. शेवटी मरण तर कोणालाच चुक्त नाही. मरणाबविच प्रत्येकाचे जीवित असते.

home-last-sec-img