Literature

भाग २

भिन्नत्व, अनेकत्व हे सर्व मावळून टाकून अद्वैत आनंदरूप राहर्णे जीवनाचे इतिकर्तव्य आहे. तद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः । ज्ञानी या सर्व जगाचॆं आनंदरूप कारणच केवळ बघत असतात असे श्रुति म्हणते. आनंदस्वरुपाच्या भानात्मक चंचल वृत्तीचा प्रादुर्भावच न होऊं देतां केवळ आनंदच होऊन राहणे आणि वेगळे कसलेंच भान म्हणून न होणे अशी ही निष्प्रपंच आत्मस्थिति आपल्याला साधावयाची आहे. ब्राह्मी स्थिति ती हीच. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह । बुद्धिश्च न विचेष्टति तामाहुः परमां गतिम् ।ज्यावेळी श्रोत्र आदि पांच ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणाचें स्फुरणसुद्धां केवळ आनंदस्वरुपांत समरसून असते आणि आनंदस्वरुपाच्या निश्चयाची वृत्त्यात्मक झुळुक सुद्धां असत नाहीं अशा घनदाट आनंदस्वरुपाच्या निबिड अवस्थेला परमगति अर्से म्हणतात. आपल्याला एक आनंदरूपच होऊन बाकी कसलेंच भान उरूं द्यावयाचें नाहीं. जीवनाचे व जन्माचें उद्दिष्ट तें हेंच आहे. आनंदस्वरुपाची स्मृतिसुद्धां आभासमय दृश्य निर्माण करून आपली आनंदघन स्थिति झांकून टाकते. असे झाले तर कामक्रोधादिकांना वश होऊन वागणें हैं किती अधोगतीचें आहे याची कल्पना तरी कुणाला करवेल ? ‘यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि स्थिताः । अथ मर्त्योऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते ।ज्यावेळी हृदयांत अंकुशाप्रमाणे रुतलेल्या अखिल कल्पना नष्ट होतील त्याचवेळीं अमृत स्वरुपाची प्राप्ति होते. याच ठिकाणी त्या अद्वितीय आनंदरूप ब्रह्मतत्त्वाची प्राप्ति होते, असें श्रुतीचें सांगणें आहे. अन्य कोणत्याहि जाणीवेचा विषय न होतां जाणीव चिद्रूप आनंदघन स्वरुपांत सम रसून गेली कीं अशी ही आत्मस्थिति म्हणून घेते. यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते । अतो निर्विषयं नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणा ।ज्याअर्थी निर्विषय जाणीवेनें मुक्ति लाभते त्याअर्थी जाणीव निर्विषय करून ती आनंदघन स्वरुपार्शी एकरूप करून ज्ञानरूप आनंदच एक होऊन राहणे म्हणजेच आत्मस्थिति. स्वरूपावस्थितिर्मुक्तिस्तभ्रंशोऽहंत्ववेदनम् ।अशी स्वरूपस्थितीच मुक्ति मी म्हणून तिथें आपल्या जाणीवेची थोडी झुळुक वाहिली तरी स्वरूपच्युति होते. असे जर आहे तर हे मानवा, मी देह मानून कामक्रोधादिकांचे विकारी जीवन कंठीत रागद्वेषांनी झळफळींत परद्रव्य, परकांता यांचा अभिलाष करणे आणि आपल्या अपस्वार्थाकरितां दुसऱ्याला पिळून अथवा त्याला नाहींसा करण्याची हाव धरणें म्हणजे ही किती तुझी अधोगति ! याचा तूच विचार कर. नराचा नारायण बनावयाचें टाकून नरकाभागी होणे हे किती अधोगतीचें आहे ! जगांत कशाला रणें माजावींत, कशाला न्यायालयें असावीत, कशाला अनीतीनें वागावें, कशाला दुसऱ्याला दुःख द्यावें, कशाला दुसऱ्याच्या स्वत्वाचे अपहरण करावें, कशाला दुसऱ्याच्या नाशाची इच्छा बाळगावी ? बा ! नराचा नारायण होऊं पाहणाऱ्या मानवा, तुला अॅटमवाँब, हैड्रोजन बाँब, संहारक अग्निबाणादि मिझाइल्स यासारखे शोध कशाला पाहिजेत ? बा मानवा, असें हें दैवी कृपेचें आनंदसाम्राज्य सोडून तूं दुःखमय जीवन कंठून कां दीन होतोस ? आनंदमात्र स्थिति हीच सहजावस्था आहे हैं कधींच विसरूं नको. ‘त ५ देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणहं प्रपद्ये ।मोक्षाची इच्छा बाळगणारा मी दयाळु देवाला शरण जातो म्हण आणि देवाची प्रार्थना कर. असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।मला असत्यापासून सत्याकडे पाठव. तमापासून स्वप्रकाशाकडे पाठव आणि या मृत्यूपासून अमृताकडे पाठव म्हणून अभेददर्शनं ज्ञानं ध्यानं निर्विषय मनः । स्वानं मलोमलत्यागः शौचमिन्द्रिय निग्रहः ॥आनंदस्वरूप परमात्याशी होणारें अभेददर्शनच ज्ञान, निर्विषय मन होणेंच ध्यान. कामादि विकारांचा मळ जाऊन मन शुद्ध होणें हेंच स्नान. आणि इंद्रियांचा निग्रह पवित्रता, अर्से तुला वेदांचें सांगणे आहे, इकडे तूं लक्ष देशील कां ? तुझें असें सुशांत परम पवित्र नि मंगलमय आनंदरूप जीवन ज्यादिवशीं होईल तोच सुदिन. त्याकरितां तुला प्रयत्न करणें नको कां ? निवृत्ति मार्गाचा म्हणजे संन्यासाचा गगनभेदी परमोच्च मार्ग तुला पेलत नसेल तर यथोक्त गृहस्थाश्रमाच्या प्रवृत्तिर्चे धोपट मार्ग तरी सोडूं नको. न सुरां पिबेत् । न कलजं भक्षीत । नोपयात्परस्त्रियम् । न हिंस्यात सर्वाभूतानि ।मद्य पिऊं नये. मांस खाऊं नये, परस्त्रियांची अभिलाषा धरूं नये, कुणालाहि दुखवूं नये, असा वेदांचा साधा उपदेश तरी मान. परदारा, द्रव्य, भूमि अभिलाषू नकोस. निर्व्यसनाचें पवित्र जीवन चालव. परोपकारी पावन चारित्र्य राख. सत्कामाचें पवित्र आयुष्य घालव. परस्त्री मातृसमान मान, परद्रव्य विषाप्रमाणे समज. परहिंसा म्हणजे स्वनाश असें ओळख. देव, गुरु, वेद, गो, प्रतिमा यांची सच्चिदानंद परमात्म्याच्या भावनेनें पूजा कर. धर्ममार्गानें वागून संपादलेल्या द्रव्याचा विनियोग स्वकुटुंबभरण, परिजनपोषण, दीनजनरक्षण, देव-गुरु-सेवा यांत कर. देवमाणूस होऊनच जग. द्वाविमावथ पन्थानी यत्र वेदाः प्रतिष्ठिताः । प्रवृत्तिलक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः । वेदप्रतिपाद्य अर्से हैं प्रवृत्ति निवृत्त्यात्मक दोनच मार्ग आहेत. या दोन मार्गाचंच वेद प्रतिपादन करतात आणि निषिद्ध मार्गापासून सोडवतात.

ज्याला म्हणून दुःखाचा कर्धीच स्पर्श होत नाहीं तो एक आनंद आहे. दुःखाचा अजीबात संपर्क नसलेल्या केवळ आनंदाच्या प्राप्तीकरितांच आपले जीवन मुसावलेलें आहे, हा अखिल मानवजातीचाच निश्चय असावयाला पाहिजे. या आनंदाचा शोध लावण्याची जग ही एक प्रयोगशाळा आहे. या जगाच्या प्रयोगशाळेत मुख्यतः अशा निर्भेळ सुखाच्या प्राप्तीचीं अचूक साधनें व वेदमतानुसार त्यांचे यथायोग्य परिशोधन धिम्या बुद्धीने व्हावयाला हवे. इतर भौतिक शोध किती झाले आणि लागले तर सर्वहि ते नाशावधि आहेत. शाश्वत सुखाची प्राप्ति त्या योगें कर्धीच होऊं पाहत नाहीं. नित्यं निरुपाधिकं निरतिशयं यत्सुखं स आनंदः ।असा आर्यांचा वैदिक सिद्धांत आहे. कधींच नष्ट न होणारें, अन्य कसल्याहि पदार्थापासून अथवा साधनापासून उपलब्ध न होणारे आणि पराकाष्टेचें जें अपार, अनंत सुख तोच खरा आनंद आहे, असा शोध वेदाच्या सहाय्यानें आर्यांनी लावला आणि या आनंदाच्या प्राप्तीनें ते कृतकृत्य झाले. एषोऽस्य परमानंदः । म्हणजे ज्ञान्याला इतर मनुष्यजातीपासून वेगळा पाडते आणि ‘ब्रह्मविदाप्नोति परम् ।ब्रह्मज्ञानी असा निरवधि आनंद प्राप्त करून घेतो म्हणजे आर्यांच्या आनंदाची प्राप्ति करून घ्यावयाची झाल्यास ब्रह्मज्ञान हें त्याचें साधन श्रुति सांगते. ब्रह्मज्ञान हें आर्यांचें सुखसाधन म्हणून अनुषंगाने आर्यांच्या जीवनाचीहि श्रुति ओळख पटवून देते, आर्याला भारत असें एक दुसरें नांव आहे. भा रूप आत्मा सर्वगतः तस्मिन् रमत इति. भारतः ।अथवा भा ब्रह्मविद्या तस्यां रमत इति भारतः ।भा म्हणजे ब्रह्मविद्या त्या ब्रह्मविद्येतच सदैव रममाण असणारा भारतअसा भारत शब्दाचा अर्थ आहे. आर्या अत्रावर्तन्त इति आर्यावर्तः । जीवनकोटीतील श्रेष्ठ मुमुक्षु ज्या ठिकाणी जन्माला येतात तो देश अशी ही आर्यावर्त शब्दाची व्युत्पत्ति आहे. एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः । स्वं स्वं चरित्रं शिक्षरेन् पृथिव्यां सर्वमानवाः ।या देशांत जन्माला आलेल्या ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखालीं अखिल जगांतील मानवांनी मानवी दिव्य जीवनाचे पाठ घ्यावेत असे मनोर्भवाः मानवाः ।मानवकुळाच्या आदिपुरुषानें मनूनें सांगून ठेवलें आहे.

‘India is the mother land of philosophy’ अशी भारत देशाची कीर्ति आहे. तत्त्वज्ञानाचा माहेरवास या दृष्टीनेच भारत देशाची उत्पत्ति परमेश्वरानेच केली. हिमालयात्समारभ्य यावदिन्दु सरोवरम् । तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्ष्यते।भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान, अशी कित्येक एकार्थबोधक नार्वे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व्यापून असणाऱ्या अशा या देवनिर्मित पुण्यपावन प्रदेशाची आहेत. दुर्लभं भारते जन्मःधन्य धन्य जो किया भारत देशांत जन्माला आला. या भारतीयांच्या धर्माला वैदिक धर्म अर्से जसें एक नांव आहे तसेच याला दुसरें एक वैदिक धर्माचा अर्थ उकलून दाखविणारे सनातन धर्मअसें नांव आहे. सना आत नशेतीति सनातनः ।अमरकोषाच्या अव्यय वर्गात धा सना नित्येअसा सतराव्या श्लोकांच्या दुसऱ्या पंक्तीला प्रारंभ झाला आहे. सना है अव्यय अर्थाचे म्हणजे शाश्वत या अर्थाचें आहे. अर्से यांत सांगितले आहे. शाश्वत सुखाचा अथवा शाश्वत सुखरूप परमात्याचा प्रचार करणारा धर्म असा सनातन धर्माचा अर्थ होतो. ना वेदविन्मनुते. तं बृहन्तम् ।असा या धर्माचा सिद्धांत आहे. वैदिक सिद्धांत समजून न घेतलेला माणूस त्या ब्रह्मतत्त्वाचा अथवा शाश्वत सुखरूप परमात्म्याची ओळख करून घेऊं शकत नाहीं, अर्से या धर्माचें मृदुमधुर पण छातीठोकपणे उघड सांगणे आहे. याच्या गर्भात हा वेद परमात्मनिगदित आहे, हे तत्त्व सामावलें आहे. “जगा जर तुला शाश्वत् सुखाची प्राप्ती हवी असेल तर तुला वैदिक सिद्धांताचा अभ्यास करून खऱ्या शाश्वत सुखाचा लाभ करून घ्यावा लागेल. या व्यतिरिक्त तूं भौतिक शोध कितीहि लावलेस आणि घरबसल्या दूरदूरचे ऐकलेस आणि पाहिलेस, स्वल्पकाळांत दूरची मजल गांठलीस, यंत्राच्या साहय्याने अल्पावर्धीत विपुल ऐहिक सुखसाधनें तूं कितीहि अपार निर्माण केलीस, आकाशांत उडालास आणि यथेष्ट तेथें फिरलास तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ, शाश्वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त, अचल समाधान बाणणे अगदीच अशक्य है निर्भक सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील, कामक्रोधादिक विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अपस्वार्थाकरितां देशाचे देश

उध्वस्त करण्याची स्वपर धातुक प्रवृत्ति वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणांत सदैव पेटत राहील, खरें सुख पाहिजे असल्यास तूं वैदिक सिद्धांताकडे बघ, तो तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यांत नित्य तृप्तीने नांदवील. सर्वांच्या पाठीमागे हात धुऊन लागलेल्या मृत्युभयापासून तुझी कायमची मोकळीक करण्याकरितां तमेवं विदित्वाऽपि मृत्युमेति नान्यः पन्था विमुक्तये ।अनंत मंगलरूप निरतिशय सुखधन एक परमात्माच आहे म्हणून त्याचे ज्ञान आणि प्राप्ति करून घेऊनच मानव या मृत्यूला ओलांडून पलीकडील शाश्वत सुखसाम्राज्यांत प्रवेश करतो आणि नित्य आनंदरुपी होतो. या मृत्युदु:खापासून सुटका करून घेण्यास दुसरा कोणताच मार्ग अचूक नाहीं. ” म्हणून जिव्हाळ्याच्या हार्दिक पुत्रप्रेमानें वेद तुला सांगत आहे. तुझ्या भारतीय महादाचार्यांचा अनुभव नि उपदेश ऐकण्याचा कंटाळा आला असल्यास, ‘अमृत सर्वांनाच सारखेंपाश्चात्य वेदमतानुयायांचा खालील उपदेश ऐकून तरी मार्गावर ये, वैदिक सिद्धांताचा मनोभावानें अभ्यास कर आणि आनंदरूप होऊन कृतकृत्य हो. नान्यतो ज्ञायते धर्मो वेदादेवेष निर्बभो । तस्मात्सर्वप्रयत्नेन धर्मार्थं वेदमाश्रयेत् ।वेदाशिवाय खरा धर्म जाणणे शक्य नाहीं. खऱ्या धर्माची उत्पत्ति केवळ वेदापासून झाली आहे. याकरितां धर्मज्ञानार्थ वैदिक विवेचनाचाच आश्रय करावा म्हणून व्यासांनी सांगितले. मनूनें यापूर्वीच वेदधर्माला श्रुतिस्मृत्यूदितो धर्मो ‘ह्यधर्मस्तद्विपर्यय:इत्यादि वचनांनी गुरुपद अथवा यथार्थ सवाधिक श्रेष्ठपद दिले आणि हाच एक खरा धर्म, दुसरा अधर्म, यानेंच मनुष्य सत्कीर्तीचा थोर पुरुष होऊन अनंत सुखाचा भागीदार होतो, असें उद्घोषित केलें. यतोभ्युदय निःश्रेयससिद्धिः स धर्मः ।अशी (कणादादिकांनी) धर्माची व्याख्या केली आणि होय ऐहिक सर्वोन्नत सुखाची आणि अनंत आत्मानंदाची प्राप्ति ज्याच्या योगानें होते तोच धर्मम्हणून पूज्यपाद शंकराचार्यांनी यालाच पुस्ती जोडली. पाश्चात्य पंडितांच्या वचनांचीच तुला वाटत असल्यास या पुढील वचनें पडताळून बघ.

home-last-sec-img