Literature

भाद्रपद वद्य एकादशी

धर्म काय सांगतो ? दुसऱ्याची वस्तु घेऊ नका ! दुसऱ्याच्या हक्काची पायमल्ली करू नका. हीच नीति
आज समर्थ होणे शक्य आहे काय ? विषमता हाच जगाचा स्वभाव आहे. ज्येष्ठता व कनिष्ठता हाच स्वभाव.
नेणारा पुढे व त्याच्यामागे सर्व जातात. कारण सर्वांचे सामर्थ्य एक नसते, यामध्ये व्यावहारिक व पारलौकिक
या दोन्ही दृष्टी आहेत व या दृष्टीने जीवन जगावयाचे.

ह्या जन्माच्या कर्मामुळे हा जन्म नसून मागील जन्मीच्या कर्मामुळे हा जन्म होय. तेव्हा जन्म प्रवाहातून
सुटण्यासाठीच सर्व प्रयत्न व त्याचकरिता परमार्थ.

ज्ञात्याचे प्राण कोठेही जात नाहीत. तो ब्रह्मात विलीन झालेला असतो. जन्मराहित्यासाठी प्रयत्नच जन्म. हा
जन्म जर फक्त ऐहिक सुखासाठीच असेल तर असे जन्म किती ? व हे कसे ठरविणार ? तेव्हा परमात्मप्राप्ती
पाहिजे असेल और त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.

आनंदभावरूप आहे हेच आनंदब्रह्म. ब्रह्म कोठे आहे ? ते ब्रह्म सृष्टीपूर्वी म्हणजेच आकारापूर्वी होते. आकार
म्हणजेच कार्य. कारण म्हणजेच ब्रह्म. त्याचा महिमा अनंत आहे. अशा या ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय हा
जन्मप्रवाह संपणार नाही. आनंद हेच परमात्मस्वरूप व त्यातच शेवट.

आर्य-संस्कृतीचे आपण सर्व सुपुत्र आहोत. पुत्र म्हणजे पहिली संतती. त्यालाच पुत्र म्हणतात. ' पुन्नाम
नरकापासून तारणारा तो पुत्र ' त्यापुढील संतती ' कामज ' होय. जी संस्कृती परमात्मप्राप्तीसाठीच आहे तीच
खरी संस्कृती. जी परमात्मप्राप्ती नाही ती संस्कृती नव्हेच. आपण परमात्मप्राप्ती करविणाऱ्या संस्कृतीचेच
वारसदार आहोत हे विसरू नका.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img