Literature

भाद्रपद वद्य चतुर्दशी

आपणास हवे असलेला, पाहिजे असलेला एकमेव आनंदच असून त्या आनंदाच्या प्राप्तीसाठीच आपले
जीवन आहे. आपणास जे काही करावयाचे तेही आनंदप्राप्तीसाठीच आनंदाची प्राप्ती करणे ही गोष्ट
आपल्या जीवनात परिपूर्णतहा भरलेली आहे. परिणामित झाली आहे. आपल्या जीवनातील मुख्य उद्देश्य '
आनंदप्राप्ती ' हाच होय. जीवनात जी प्रत्येक गोष्ट करावयाची तीही आनंदासाठीच.

तिन्ही जगात आनंदासाठीच सर्व प्रयत्न केले जातात व त्यात आनंदाखेरीज कोणताही उद्देश नसतो. उद्देश
साध्य करणे म्हणजेच आनंद होणे, आनंदाची प्राप्ती करून घेणे होय.

आपणास सुख मिळावे, आपण सुखी व्हावे या एकाच उद्देशाने प्रत्येकजण कर्म करीत असतो. दु:ख
मिळावे म्हणून कोणीही कोणतेही कर्म करीत नसतो. एखाद्या कर्मातून दु:ख निर्माण होणार असेल तर ते
कर्म करण्याची प्रवृत्ती असत नाही. सुख मिळावे व दु:ख नाहीसे व्हावे हेच प्रत्येकाच्या कर्मामधून दिसून येते. हे
सुख कोणते ? हा एक प्रश्न आहे व तो सोडविण्यासाठीच सर्व श्रुती, स्म्रुती, शास्त्रे यांची प्रवृत्ती आहे.

ज्याला ' आनंद ' असे म्हणतात अथवा आनंद नावाची जी गोष्ट आहे ती सत्य आहे व त्याची प्राप्ती व्हावी
हेही सत्यच आहे. पण तो आनंद कसा असावा ? ज्याला उत्पत्ति व नाश आहे अशा आनंदाची प्राप्ती झाली
तर त्यापासून समाधान मिळेल काय ? नाही. कधीही समाधान मिळणार नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img