Literature

भाद्रपद वद्य तृतीया

या संसाररूपी वृक्षाचे मूळ आनंदरूप ब्रह्मच होय. बीजातून प्रथम अंकूर बाहेर पडतो. त्याप्रमाणे आनंदरूप
परब्रह्मातून अहं ही आत्मानुभूती उत्पन्न होते. ज्याप्रमाणे अंकुरातुन प्रकृति व पुरूषरूपी दोन नवी पालवी
फुटते. नंतर पालवीचा जसा महावृक्षांत विस्तार होतो त्याप्रमाणेच प्रकृति-पुरूषाचा विस्तार म्हणजेच अखिल
विश्व होय. या संसारवृक्षाचा गाभा वेद होय. वेदांच्या शाखा प्रशाखा आणि त्यातुन सांगितलेल्या साधना ह्या
वृक्षाच्या शाखा प्रशाखा होत. विविधकर्मे ही याची पाने होत. सत्कर्मापासून उत्पन्न होणारी चित्तशुध्दी हेच याचे
फूल होय. फुलापासून फळ उत्पन्न होते. अशाप्रकारे मूळ बीजापासून वृक्ष आपला विकास घडून आणतो
तसाच हा संसाररूपी वृक्षही आपल्या मुलभूत ब्रह्मानंदाच्या प्राप्तीमुळे पूर्ण विकसित होते. भूतमात्रांची
उत्पत्ती या आनंदरूपी ब्रह्मापासून असून त्यानेच त्याची स्थिती कायम असते. या आनंदाच्या प्राप्तीसाठी सर्व
भूतजात. त्या मूलस्वरूपाकडे आपल्या प्रगताल जीवनाचा ओघ नेऊन शेवटी त्यात एकरूप होऊन कृतकृत्य
होतात.

जे सुख नेहमी एकाच स्वरूपी, अन्य कशातही प्राप्त न होणारे व स्वतः सर्वाधिक आहे त्या एकमेव सुखास
आनंद म्हटले जाते. अन्य निरपेक्ष स्वतःसिध्द ज्ञानमात्र आनंदस्वरूपाच्या बोधामुळे जी आनंदरूपस्थिती
प्रकाशमान होते तेच एकमेव सुख होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img