Literature

भाद्रपद वद्य द्वितीया

बाह्य जड पदार्थाच्या योगाचे प्राप्त होणाऱ्या सर्वसामान्य सुखाकरता आपल्या जीवितांचे सारसर्वस्य
असलेले खरे सुख घालविणे योग्य होणार नाही. क्षणभंगुर सुखासाठी जीविताचा नाश करणे अयोग्यच.
अल्पसुखाने आपण कृतकृत्य कसे होणार ? म्हणून आपणास प्राप्त झालेली योग्यता, अधिकार यांना
अनुसरून विवेकी बनून खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड करून आपण त्याचाच ध्यास घेतला पाहिजे.
यामुळे आपणास धन्यता मिळवून देणारे ध्येय म्हणजेच अनंत परमात्मसुखाची प्राप्ती होईल. या सर्व गोष्टींचा
पूर्ण विचार करणारी माणसे सुध्दा विषयामध्ये गुरफटलेली आढळतात. त्याचे खरे कारण म्हणजे
त्याच्याठिकाणी असलेले सुखपरीक्षेचा, विवेकाचा व संयमाचा अभाव हेच आहे. सर्वांना पुण्यफलस्वरूपी
सुख पाहिजे आहे. पण पुण्य मात्र ते करू शकत नाहीत. ते पापच करीत असतात. परंतु त्यांना त्या पापापासून
मिळणारे दुःख नको असते. विषयसुखासाठी धडपडणारा मानव म्हातारपण किंवा मरण चुकवू शकत नाही
या दोन्ही गोष्टी अत्यंत दुःखप्रदच. विवेकी मनुष्याने विषयसुखाचा संपर्कही नसलेला मार्ग चोखाळला पाहिजे
आणि तो मार्ग म्हणजेच परमात्मप्राप्त होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img