Literature

भाद्रपद वद्य नवमी

आनंदरूप हेच परमात्मस्वरूप होय. आपली उत्पत्ती परमात्म्यापासून. मग आपलेही स्वरूप अानंदरूपच.
आपण आनंदरूप नाही म्हटले तर आपले दुसरे स्वरूप दु:खरूपच. पण ते तसे नाही. आपल्याला आनंदाची,
सुखाच्या प्राप्तीची इच्छा होते. या अखिल विश्वाची उत्पत्ती आनंदापासून झाली असून त्यात समरसून जाणे
हा स्वभावधर्मच होय. कारण आनंदरूप असल्यावर कार्येही आनंदरूपच. आनंद हेच आपले कार्य, तेच आपले
जीवन, तेच आपले कर्तव्य, तेच आपले मूळस्वरूप ओळखून त्यासारखे राहिले पाहिजे व मग आपल्या त्या
आनंदातच रहाणे हाच आपला धर्म, हे खरे तत्त्व व हीच आपली स्थिती.

आपण आनंदरूपच असल्याने त्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नात असणे व ते प्राप्त करून घेऊन त्यातच मग्न, मस्त
असणे हेच खरे कर्तव्य, हेच तत्त्वज्ञान व हेच तत्त्वचिंतन होय. यात दुमत नाही. आनंद हेच महात्म्याचे जीवन,
त्याचा आचार, विचार, उच्चार आणि प्रचार. त्यांना दुसरे काय कर्तव्य आहे ?

' आनंद हेच आपले मूळस्वरूप ' हे तत्व ठसवून, बिंबवून त्यातच रहावे. आपण जर असेच आनंदात राहिलो
तर दु:ख, संकटे, आपत्ती कोठून येतील ? हे आपले तत्त्वज्ञान आहे. ते जाणून घेऊन त्या जगकर्त्या प्रभूची सेवा
करीत राहिलो तर फसविणे, त्रास देणे, द्वेष करणे, मत्सर करणे, नुकसान करणे रहाणारच नाही. वेदांच्या
आज्ञा जशाच्या तशा पाळून त्या आनंदात डोलत रहाणे हीच ' आर्यसंस्कृती ' होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img