Literature

भाद्रपद शुद्ध तृतीया

आर्यसंस्कृतीने आपल्या पुत्रांना पुढीलप्रमाणे शिकवण दिली आहे.

*' अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः |*

*दानं दया दमः शान्तिः सर्वेषां धर्मसाधनम् || '*

कोणालाही पीडा न देणे, सत्यभाषण करणे; कोणत्याच प्रकारच्या परस्वाचे अपहरण न करणे; सदैव
शारिरीक व मानसिक पावित्र्य राखणे; मनावर विजय मिळवून इंद्रियदमन करणे; यथाशक्ती अन्न, वस्त्र व धन
यांचे दान करणे; दयार्द्र होऊन दिनांचे संरक्षण करणे; दुष्टप्रवृत्तींच दमन करणे; नेहमी शांत राहून मनाचा क्षोभ
होऊ न देणे हाच समस्त मानवजातीचा धर्म होय.

आमची वैदिक आर्यसंस्कृती विश्वातील मानवमात्राकडून पुढील सर्वसामान्य व सुदृढ मागणी करते.

*' समानीव आकूतिः समाना ह्रदयानि वा |*

*समानमस्तु वो मनो यथावः सुसहासति || '*

विश्वातील सर्व मानवांनो ! अभ्युदय व निःश्रेयस यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.
एकमेकांबरोबर सहयोग करावा. आपला प्रेमभाव एकमेकांबद्दल वाढता असावा. राष्ट्रीय, सामाजिक,
आर्थिक व पारलौकिक अशी सर्व कर्तव्ये आपण सर्वांनी एकमनाने केली पाहिजेत.

आज मीही आर्यसंस्कृतीच्या दिव्यवाणीचा पुनःउच्चार करून आपणा सर्वांना मंगलकामना इच्छितो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img