Literature

भाद्रपद शुद्ध द्वितीया

आर्यसंस्कृती ही विश्वात्मक असून आनंदघन परमात्म्यैक्य हेच हिचे उद्दिष्ट. या स्वरूपभूत अनंत आनंदाचा
विचार, प्रचार व आचार येथे वर्णिला आहे. आर्यसंस्कृतीमध्ये दुःखाचा लवलेशही नाही. भेदाचा मागमुस नाही,
स्वार्थाला किंचितही प्रवेश नाही, वैयक्तिक सुखाचा पत्ताही नाही, प्राणिमात्राच्या सुखाचीच इच्छा येथे
विकसीत होते. प्राणिमात्रांचा उद्धार हा हिचा सत्यसंकल्प आहे. प्राणिमात्रांच्या दुःखाची निवृत्ती करणे हाच
हिच्या दिव्यजीवनाचा केंद्रबिंदु आहे.

*' न तव्हं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवम् |*

*कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् || '*

' मला राज्याची अभिलाषा नाही तसेच स्वर्गाचीही इच्छा नाही इतकेच नव्हे तर मला मोक्षाचीही
अभिलाषा नाही. फक्त हताश व दुःखी कष्टी जीवांचे दुःख व कष्ट नाहिसे करावेत हीच एकमेव इच्छा आहे. '
असे ती म्हणते.

तिने आपल्या कित्येक लाडक्या पुत्रांसमक्ष आपले ह्रदय उघडे केले आहे.

*'यदा न कुरूते भावं सर्वभूतेष्वमड्•गलम्*

*समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः | '*

जो अखिल प्राणिमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अमंगल भावना ठेवीत नाही अशा समदृष्टी
पुरूषास दाहीदिशा सुखमयच असतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img