Literature

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा

' दृश्यमान अशा या विश्वाला कारण असलेले ब्रह्म आनंदरूपच आहे. उत्पन्न झालेली सर्व दृष्टी आनंदाच्या
शक्तीनेच जीवंत आहे. आपले मुलकारण असलेल्या आनंदाकडेच तिची सारी धावाधांव आहे आणि शेवटी
सर्व सृष्टी आपले मुलकारण असलेल्या आनंदात प्रविष्ट होऊन त्यातच एकरूप होत असते ' असे श्रुतिमातेचे
म्हणणे आहे.

वस्तुतः हा शोध पुर्णपणे मुलग्राही असून तो अंतिम शोध होय. याच्यापेक्षा कोणताही मोठा शोध ' न भुतो
न भविष्यति ' आजपावेतो झाला नाही व पुढेही होणार नाही. हीच सर्व शोधांची परिसमाप्ती, परिपूर्णता
असून उद्देशजाताची पुर्ती आहे. हिच्यामध्येच विश्वमित्रांच्या प्राप्तव्य भावनेची व तृष्णेची शांती होते. अहर्निश
प्रयत्नशील अशा मनाच्या सुखपिपासा येथे येऊन पुर्णपणे शांत होतात. सुखाच्या अचुक शोधामुळे
विश्वातील अहमहमिकांचा अंत होतो. त्याची सारी तडफड नष्ट होते. विकारांची निर्विकारांमध्ये परिणती होते.

समरांगण बनणारे जग आनंदात विलीन होऊन त्यांत बुडून ते एक पवित्रतम ध्यानक्षेत्र बनते. या शोधाच्या
योगाने विश्वातून दुःखाचा अस्त होतो. शोक सुकून जातो व कमी असलेले पुर्ण होते. मोठ्यात मोठ्या
श्रीमंतापासून अठराविश्वे दारिद्रयाने संत्रस्त झालेल्या जिवापर्यंत सर्वाचे जीवन शांत, नित्यतृप्त, अचल
अशा समाधानाने परिपुर्ण सर्वसमान, अनंतसुखात्मक आणि त्यातच सत्यसुखमय बनते यांत किंचीतही
संदेह नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img