Literature

भाद्रपद शुद्ध सप्तमी

सुरवातीस आपण पुर्ण भक्ती करू शकत नसलो तरीही त्याप्रमाणे वागत राहिल्यास क्रमाक्रमाने पुर्णभक्ती
आपल्या जीवनांत स्थिर होऊ शकते. संत तुकाराम चित्रपटांत तुकारामाची भूमिका करणाराची शेवटी
अशीच परिस्थिती झाली होती तर ज्ञानेश्वराची भूमिका धारण करणारा ख्रिश्चन गृहस्थ हल्ली नेहमी
ध्यानधारणेत मग्न असतो. अशिच एक गोष्ट आहे.

एक कोळी एका महात्म्याच्या आश्रमाच्या सुंदर परिसरांतील एका तळ्यात मासे पकडण्यासाठी नेहमी
जाळे टाकीत असे. अशाच एकावेळी तेथील महाराज या रस्त्याने घोड्यावर बसून येत आहेत असे त्याने
ऐकले. ते ऐकताच तो कोळी घाबरला व ' आता आपल्याला शिक्षा होईल ' अशी भिती वाटून त्याने साधूचा
वेश धारण केला. थोड्याच वेळात राजा तेथे आला व साधुवेशधारी कोळ्यास बघून ' हा कोणीतरी मोठा
तपस्वी असावा ' अशी कल्पना करून त्याने त्या साधूस नमस्कार केला. त्यावेळी त्या कपटवेषधारी
कोळ्याच्या मनांत नाना प्रकारच्या विचारांनी काहूर केले. ' खरा विचार केला तर मी साधू नाहीच पण राजाच्या
ताब्यातील तळ्यातले मासे चोरून पकडण्याचा मी गुन्हाच करीत होतो. तसेच राजास चकविण्यासाठीच मी हा
साधुवेश धारण केला. खरे पाहिले तर हेही पापच. अशा रितीने फसविणाऱ्या मला साधुवेशात असा मान
मिळाला तर खरा साधु झालो तर किती मान मिळेल ' हा विचार करता करतांच तो खरोखरच साधु झाला
म्हणूनच नेहमी चांगली गोष्ट करीत राहून ते वळण शरीरांत भिनविले पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img