Literature

भारत

हिंदुस्थान व हिन्दु या शब्दांचा विचार केल्याप्रमाणे भारत या शब्दाचा विचार करूं. भारत आणि हिन्दुस्थान या दोन्ही नांवांनी ओळखला जाणारा देश एकच आहे. या देशाची सीमा खालीलप्रमाणे आहे.

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षे तद्भारतं नाम भारती यत्र संततिः ॥ दक्षिणसमुद्राच्या उत्तरेला व हिमालय पर्वताच्या दक्षिणेला म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत ज्या देशाची सीमा आहे तो भारत देश व या भारत देशाची संतति भारती होय. हिन्दुस्थान आणि हिन्दु, भारत व भारती हे शब्द समानार्थक आहेत हे शब्दांच्या अर्थावरून स्पष्ट कळून येईल.

home-last-sec-img