Literature

भोगानां दुःखकारणत्वं नाम प्रकरणं तृतीयम

भोगां मधीन दुःखाचे कारणः—
(भोग म्हणजे उपभोग घेणे, त्यांतील आनंद घेणे व नंतर परिणामी दुःख सहन करणे।)

भोग एव महारोगा विषं विषयजं सुखम्‌‌।
वसनावृध्दितो भोगः भोगवृध्द्याच वासना ।।1।।
अर्थ— भोग म्हणजे विषयांपासून मिळणारा आनंद घेणे व परिणामी दुःख भोगणे हाच एक महारोग असून पंचेन्द्रियांना ते ते भोग पुरविल्याने त्या—त्या वासनांची वृध्दि होते आणि त्या—त्या वासनांमुळे तो तो भेाग पण वाढतो. ।।1।।

जनिमत्पदार्थभोगेच्छा या सा विषयवासना।
अनेक जन्म हेतुःस्याज्जन्मतो दुःखमेव हि ।।2।।
अर्थ— भौतिक पदार्थांच्या भोगाची इच्छा ही ती वासना असते. आणि अनेक जन्म घ्यावे लागण्याची ती एक निश्चत कारणीभूत होणारी गोष्ट असून तेच खरे दुःखाचे कारण आहे. ।।2।।

घटियन्त्रामिवावृत्तिर्दुःखानां जन्मनां यतः ।
कार्यमात्रे सुखेच्छा या त्याज्यैव भवति ध्रुवम।।3।।
अर्थ— घड्‌याळाचा काटा ज्या प्रमाणे पुनःपुनः त्याच चक्राकार स्थानावर फिरतो त्या प्रमाणे दुःख आणि पुनर्जन्म ह्‌याची पुनःपुनः आवृत्ति होते. ।।3।।

विहाय ब्रह्मचैतन्य सुखार्थं यद्‌बहिर्मुखम्‌‌।
मनोविषयामन्वेति तद्‌‌दुःखाय प्रकल्पते।।4।।
अर्थ— ब्रह्मचैतन्यरुपी सुख सोडून विषयांपासून सुखप्राप्ती करण्याच्या मागे लागलेले मनाला हे अंतराबाहेरील गोष्टींचा पाठलाग करुन दुःखच प्राप्त करतों.

मनो हि द्विविधं प्रोक्तं शुध्दी चा शुध्दमेव च।
अशुध्दं कामसंङकल्पं शुध्दं कामविवर्जितम्‌‌।।5।।
अर्थ— मन हे दोन प्रकारचा संकल्प करीत असते, एक तर शुध्द संकल्प आणि दूसरा अशुध्द संकल्प. जो संकल्प काम म्हणजे वासनेसाठी असतो तो अशुध्द संकल्प होय, आणि जो निष्काम वासनारहित तो शुध्द संकल्प म्हटला जातो. ।।5।।

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यैनिर्विषयः स्मृतम्‌‌।।6।।
अर्थ— मन हेच माणसाच्या बध्द आणि मुक्त अवस्थेला कारण समजले जाते. बध्द मन हे विषयांमध्येच गुंतलेले असते. आणि मुक्तमन हे विषयांपासून वासनारहित राहून अविकारी राहते. ।।6।।

यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तरिष्यते।
तस्मान्निर्विषयस्यास्य नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणा।।7।।
अर्थ— निर्विषय झालेले मन हे मुक्तिसाठी प्रयत्न करुन त्या दिशेने वाटचाल करते. आणि म्हणून मुमुक्षुने नेहमी निर्विषय राहूनच कार्य करावे. ।।7।।

निरस्त विषयासंङग सान्निरुध्दं मनो हृदि।
यदा यात्युन्मनीभावं तदातत्परमं पदम्‌‌।।8।।
अर्थ— ज्या वेळेस मन हे विषयांचा संग सोडून हृदयामध्ये उन्मनी भाव धारण करुन स्थित होते तेंव्हाच ते परमपद प्राप्त करते. ।।8।।

तावदेवनिरोद्धव्यं यावद्‌‌ हृदिगतं क्षयम्‌‌।
एतज्ज्ञानं च मोक्षं च अतोन्यो ग्रन्थविस्तरः।।9।।
अर्थ— तो पर्यन्त हा निरोध करावा, जो पर्यंत खोलवरच्या हृदयांतील वासना नष्ट होत नाहीत. आणि त्या कामनांचा त्याग करावा आणि हीच ती ज्ञानप्राप्तीची अवस्था आहे, बाकी सगळा नुसता ग्रंथविस्तारच आहे. ।।9।।

यन्मनस्त्रिजगत्सृष्टि स्थितिव्यसनकर्मकृत।
तन्मनो विलय याति तद्विष्णोः परमं पदम्‌‌।।10।।
अर्थ— ज्या स्थिति मुळे त्रिलोकांत (स्वर्ग,भू,पाताळ) जन्म येतो तो आपल्या कर्मा मुळे येतो. पण जर मन इच्छारहित झाले तर जी निर्विकार स्थिति निर्माण होते, त्यामुळे विष्णुचे परम पद म्हणजे स्थिर ध्रुव स्थिति प्राप्त होते. ।।10।।

संङकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः।।11।।
शनैः शनैरुपरमेद बुध्द्या धृतिगृहितया।
आत्मसंस्थं मनःकृत्वा न किंञिचदपि चिन्तयेत्‌‌।।12।।
अर्थ— सर्व कामनांचा त्याग करुन वासनाशून्य अश्या मनाचा लाभ घेण्यास मनाचा पक्का निश्चय करुन, मनानेच सर्व इंद्रिय समूहाचा ताबा घेवून (नियंत्रित करुन) हळूं—हळूं बुध्दिमध्यें धैर्य प्राप्त करुन कोंडून (धारण करुन) दूसरे कांही हीं चिंतन करु नयें। ।।11—12।।

यतो यतो निश्चिरति मनश्चञचलमस्थिरम्‌‌‌‌।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्‌‌।।13।।
अर्थ— जसजसे मन चंचलपण सोडून स्थिर होत जाते, तसतसे ह्‌याला नियंत्रित करुन आत्मस्थिति मध्ये विलीन करावें. ।।13।।

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्‌‌।।14।।
अर्थ— प्रशान्त अश्या निष्काम मनाच्या अवस्थेतच योगी लोकांचे मन आनंदित होते आणि राजस्‌ गुण (चंचलता) शान्त होवून निर्मल अश्या शान्त ब्रह्मस्थितित ते स्तब्ध होते. ।।14।।

आत्मानं रथिनं विद्याच्छरीरं रथमेव तु।
बुद्धि तु सारथिं विद्यान्मनः प्रग्रहमेवच।।15।।
अर्थ— बुध्दिला सारथी म्हणून मन हाच लगाम आहे. इन्द्रिय हे घोडे असून विषय हे त्यांचे (चरण्याचे) कुरण आहे. शरीर हा रथ असून आत्मा हा त्यांतील सवार यात्री आहे. अशी कल्पना आहे. ।।15।।

इन्द्रियाणि हयांनाहुर्विषयांस्तेषु गोचरान्‌‌।
आत्मेन्दियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।।16।।
अर्थ— इन्द्रिय (नेत्र,घ्राण,कर्ण,रसना,स्पर्शन्‌‌) हे पंचेन्द्रिय, हे त्या रथाचे घोडे असून त्यांना चरण्यासाठी विषय हे हिरवेगार रान, मैदान आहे. आत्मा हा इन्द्रिय आणि मनोयुक्त होवून त्यांचा भोग घेणारा म्हणजे भोक्ता आहे, असे ज्ञानी मनीषी म्हणतात. ।।16।।

यस्त्वविज्ञानवान्भवत्ययुक्तेन मनसा सदा।
तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः।।17।।
अर्थ— जो सदा अविद्यायुक्त अज्ञानी मनाने नित्य वेगळयाच प्रकारे म्हणजे विषयी होवून राहतो, तो मोकाट आणि बेभान घोड्‌यावर बसून दिशाहीन यात्री सवारा सारखा भटकत जातो. ।।17।।

यस्तु विज्ञानवान्भवति युक्तेन मनसा सदा।
तस्येन्द्रियाणि वश्यानी सदश्वा इव सारथेः।।18।।
अर्थ— जो विद्यावान्‌ होवून योग्य अश्या मनःस्थितिने इन्द्रियांना आपल्या ताब्यात ठेवून राहतो, तो नियंत्रीत घोड्‌यावरील स्वारासारखा योग्य दिशेला जातो. ।।18।।

यस्त्वविज्ञानवान्भवत्यमनस्कः सदाशुचिः।
न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति।।19।।
अर्थ— जो अविद्याग्रस्त होवून नित्य विमनस्क आणि अपवित्र अश्या मनःस्थितित राहतो, तो ते विष्णुपद प्राप्त करीत नाहीं. आणि पुनःपुनः संसार चक्र्रांत फसतो. ।।19।।

यस्तु विज्ञानवान्भवति समनस्कः सदा शुचिः।
स तु तत्पदमाप्नोति यस्माद्‌‌भूयो न जायते ।।20।।
अर्थ— जो आत्मविद्या प्राप्त करुन सत्वयुक्त अंतःकरणाने पवित्र व विचारी होवून ते ध्रुवपद प्राप्त करतो तो पुनःपुनः जन्ममरणाच्या चक्रांत पडत नाहीं. ।।20।।

विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान्नरः।।
सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्‌ ।।21।।
अर्थ— विज्ञानयुक्त असा जो सारथी असतो तो, आणि ज्याचे मन हे नियंत्रित अश्या लगामाने (दोरीने) बरोबर ताब्यात आहे, तो महान्‌ अश्या मार्गाने जाऊन तो परम पद म्हणजे विष्णुपद प्राप्त करतो. ।।21।।

इन्द्रियेभ्यः पराह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः।।
मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान्परः।।22।।
अर्थ— इन्द्रियांपेक्षा कामना इच्छा ह्या समर्थ आहेत, कामनापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ आहे, बुद्धिपेक्षा आत्मतत्व श्रेष्ठ आहे. ।।22।।

महतः परमव्यक्तमव्यक्तात्पुरुषः परः ।।
पुरुषान्नपर किञिचत्सा काष्ठासा परा गतिः।।23।।
अर्थ— महत्‌ तत्वापेक्षा अव्यक्त तत्व श्रेष्ठ आहे. आणि त्या पुरुषतत्वापेक्षा कांही ही श्रेष्ठ नसून ती स्थितीच परमगति आहे.।।23।।

एष सर्वेषु भूतेषु गुढोऽऽत्मा न प्रकाशते।।
दृष्यते त्वय्यया बुध्द्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः।।24।।
अर्थ— गूढ असे आत्मतत्व ह्या सर्वप्राणीमात्रांमध्ये एकदम असे दिसत नाहीं. सूक्ष्मदर्शी अश्या तीक्ष्ण बुध्दिनेच ते जाणवते.।।24।।

यच्छेद्‌‌वाङमनसी प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान आत्मनि।।
ज्ञानमात्मनि महति नियच्छेच्छान्त आत्मनि ।।25।।
अर्थ— जर प्राज्ञ आणि ज्ञानवान साधक (उपर्युक्त गूढ आत्मतत्व) आपल्या वाणीत आणि मनांत शोधू इच्छित असेल, जणू चाहत असेल तर त्याने आपले मन शान्त स्थितित धारण करावें. ।।25।।

इन्द्रियाणां विचरतां विषयेष्वपहारिषु।।
संयमे यत्नमातिष्ठेद्विद्वान यन्तेव वाजिनाम्‌‌ ।।26।।
अर्थ— मनोमनी विषयां मध्ये विहार करतांना त्या मनाचेच अपहरण होते, त्या मनात ज्या प्रमाणे मोकाट सुटलेल्या घोडयांना त्या वरील चतुर स्वार आपल्या काबुमध्ये नियंत्रणांत ठेवतो तसे विद्वानाने आपले मन नियंत्रित ठेवावे. ।।26।।

इंन्द्रियाणां प्रसङगेन दोषमृच्छत्यसंशयम्‌‌।।
सान्नियम्य तु तान्येव ततःसिद्धिं नियच्छति।।27।।
अर्थ— इंद्रिय सक्र्रिय झाल्यावर दोष उत्पन्न होतात, दिसू लागतात, त्यांचे संयमन करुन नन्तरच सिद्धि प्राप्त होते. ।।27।।

न जातु—कामःकामानामपभोगेन शाम्यति।।
हविषा कृष्णवह्येव भूय एवाभिवर्धते।।28।।
अर्थ— केंव्हाही काम आणि कामना ह्या उपभोगाने शमित होत नाहीत. आहुति दिल्यावर अग्नि हा जास्तच भडकतो. ।।28।।

यश्चैतान्प्राप्नुयात्सर्वान्‌ यश्चैतान्केवलांस्त्यजेत्‌‌।।
प्राापणात्सर्वकामानां परित्यागो विशिष्यते।।29।।
अर्थ— जो ह्या कामनांना सर्वर्थाने प्राप्त करुन घेतो आणि जो ह्यांचा सर्वशः त्याग करतो त्या दोघांमध्ये त्यागी हाच सर्वश्रेष्ठ आहे. ।।29।।

न तथैतानि शक्यन्ते सन्नियन्तुमसेवया।।
विषयेषु प्रजुष्टानि यथा ज्ञानेन नित्यशः ।।30।।
अर्थ— हे विषय (वासना) केवळ त्यांचे सेवन करुन आनंदप्राप्ती करुन देत नाहीं, त्यांचे नियंत्रण होत नाही, तर केवळ ज्ञानानेच त्यांचे शमन होते. ।।30।।

श्रुत्वा स्पृष्ट्‌‌वा च दृष्ट्‌‌वा च भुक्त्वा ध्रात्वा च यो नरः।।
न हृष्यति ग्लायति वा स विज्ञेयो जितेन्द्रियः।।31।।
अर्थ—— जो माणूस ह्‌या विषयांचे एैकून, बघून, स्पर्शकरुन, धारण करुन आनंदित होत नाहीं किंवा त्यास ग्लानी होत नाहीं तो स्थिरधी, जितेन्द्रीय जाणावा. ।।31।।

इन्द्रियाणां तु सर्वेषां यद्येकं क्षरतीन्द्रियम्‌‌।।
तेनास्य क्षरति प्रज्ञा दृतेः पादादिवोदकम्‌‌।।32।।
अर्थ— सर्व इंन्द्रियांमधून एक जरी इन्द्रिय ढळले, अर्थात त्यांत विकार उत्पन्न झाला, तर ज्या प्रमाणे पायावर टाकलेले पाणी थेट खाली जमीनीकडेच येते, त्या प्रमाणे त्या साधकाची बुद्धि क्षरित (क्षीण) होते. ।।32।।

यस्तुजातपदार्थेभ्यः सुखमिच्छति मानवः।।
ग्राहं दारुधिता धृत्वा तर्तुमब्िंध स ईहते।।33।।
अर्थ— मनुष्य जर ह्या भौतिक युगात (जात उत्पन्न झालेले— एैहिक) पदार्थापासून सूख मिळेल असे समजून त्याच्या मागे लागला तर एखादा माणूस आत्मघातकी होईल कसा ? तर ज्या प्रमाणे समुद्रांत पडल्यावर (जीव वाचवण्यासाठी) पोहत जातांना एकाद्या काळया व कठिण धोंडाला लाकूड म्हणून समजला आणि भ्रमित होवून मगरालाच जाउन पकडू लागला तर तो आत्मघाती होईल व तसे ते अशक्य आत्मघातकी होईल. ।।33।।

आदिमध्यावसानेषु दुःखं सर्वमिंदं यतः।।
तस्मात्सर्वं परित्यज्य तत्वनिष्ठो भवेत्सुधीः ।।34।।
अर्थ— आदि, मध्य आणि अंत ह्या तिन्ही स्थितित हे दुःख पर्यवसायीच आहे, म्हणून तत्वनिष्ठ सुबुध्द साधकाने ह्या सर्वांचा त्याग करुन सुखी व्हावें. ।।34।।

अविद्यातिमिरातीतं सर्वाभासविवर्जितम्‌‌।
आनन्दममलं नित्यं मनोवाचामगोचरम्‌‌।।35।।
सत्यं ज्ञानमनन्तं यत्‌ परब्रह्मसनातनम्‌‌।।
तदहं तदहं चेति स्वात्मानं भावयेत्सुधीः ।।36।।
अर्थ— अविद्या आणि अंधकाराच्या पलीकडील सर्व भ्रमापासून दूर शाश्वत निर्मळ अश्या वाणी आणि मनाला अकलनीय ते सत्य अनन्त परब्रह्म सनातन ‘‘ब्रह्मतत्वच‘‘ मी आहे (तदहम्‌‌) तेच माझ्‌‌या अंतरंगात आहे, असे सुबुध्द साधकाने जाणावें। ।।35—36।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे भागानां दुःख कारणत्वं नाम तृतीय प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img