Literature

माघ वद्य एकादशी

मनुष्यप्राण्याचा उद्देश अनंतसुख प्राप्त करून घेण्याचा असतो व तो साध्य करण्यासाठी त्याचे नानाप्रकारचे प्रयत्न चालू असतात. परंतु आपले साध्य काय ? आपले ध्येय काय ? हे निश्चित ठरविल्याशिवाय केलेले कोणतेही प्रयत्न व्यर्थ होत. अशा प्रयत्नांचे फळ म्हणजे निराशा, अशांति. मनुष्याची अशी दुरावस्था होऊ नये आणि त्यांचे जीवनसाध्य न चुकता सुखाकडे जाण्याकरता श्रुति मातेने तीन मार्ग सांगितले असून त्यांना आपण योग म्हणतो व त्यापैकीच ‘ भक्ती ‘ हा एक योग आहे.

भक्ती करणे व ती साधणे कठीण नाही. कारण भक्ति म्हणजेच प्रेम व प्रेम म्हणजेच भक्ति. भक्ति व प्रेम हे तात्विकदृष्ट्या एकच होत.

भक्तीचे मित्रभक्ति, पुत्रभक्ति, मातृ-पितृभक्ति, गुरूभक्ति, देशभक्ति असा प्रकार असले तरी सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली भक्ति असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा भक्तीच्या स्वरूपात किंचितही कमीपणा येऊ नये म्हणून व भक्तीचे महत्त्व कायम स्वरूपी समजण्याकरता श्रुतिमातेचा सल्ला असून *’ मातृदेवो भव | पितृदेव भव | आचार्यदेवो भव | अतिथिदेवो भव | ‘* असे उपनिषदे उद़्घोष करतात. पण सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ परमात्माच आहे व त्याच्या ठिकाणी आपली भक्ति असणे आवश्यक आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img