Literature

माघ वद्य त्रयोदशी

गुरू या शब्दाला श्रुतींनी ‘ ब्रह्म, भूमा ‘ अशी अन्वर्थक नांवे दिली असून त्यांना व गुरू या शब्दाचा अर्थ एकच आहे. *’ बृहत्वात् ब्रह्म ‘* जे मोठे आहे ते ‘ ब्रह्म ‘ व *’ बहुर्भावः भूमा ‘* सर्व वस्तूपेक्षा श्रेष्ठत्वदर्शक असणारे म्हणून ‘ भूमा ‘ या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच. सर्वश्रेष्ठ, सर्वात मोठे, ज्याला मोज-माप नाही असाच या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे. भूमा म्हणजे मोज-मापाच्या पलीकडचे. ते मोजता येत नाही व मापताही येत नाही. जी वस्तू सर्व वस्तूंना आपणांस सामावून घेते ती पूर्ण वस्तू होय. त्यापेक्षा मोठी अशी कोणतीच वस्तु असू शकत नाही. *’ तदुनात्येति कश्च न ‘* त्यापेक्षा जास्त सामर्थ्य असलेली कोणतीच वस्तु नाही हे निश्चित. अशा अतिश्रेष्ठ वस्तुचा अर्थ गुरू किंवा भूमा या शब्दांनी वर्णन केला आहे. गुरूच्या महत्त्वाचे वर्णन करण्यासाठी यथार्थ व अन्वर्थक शब्द सापडणे कठीण आहे. अशाप्रकारे अपार सामर्थ्य असणारे जे गुरू त्यांना आपण ‘ समर्थ ‘ असेच संबोधित असतो.

श्रुतींना गुरू अगम्य आहे. *’ तस्य नेति नेति इति आदेशः | ‘* म्हणजेच ‘ हें नाही ‘ हे नाही असे म्हणून श्रुति अवर्णनीय गुरूंचे वर्णन करू शकल्या नाहीत याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img