Literature

माघ वद्य दशमी

आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यास ते नाहीसे करण्याची शक्यता असते. पण उलटपक्षी ते तसेच राहून जातात. चोरांना घरात कोंडून ठेवल्याप्रमाणेच हे आहे.

परदोष दोषीदृष्टीने पाहिल्यास आपली दृष्टीही कलुषित होते. परनिंदेने स्वतःच्या जिभेस विटाळ होतो. आपल्या दुःखाचा भार दुसऱ्यावर टाकल्याने ते नाहीसे होणार नाही तर स्वप्रयत्नाने ते नाहीसे करणे आवश्यक असते. आपली चूक दुसऱ्याच्या पदरी बांधल्यास ते आपले द्वेषी बनतात. कोणत्याही कारणासाठी दुसऱ्यास दुःख देणे योग्य नव्हे. कारण सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्मा भरलेला आहे. दुसऱ्याला संतोषित केल्यास त्याच्यामध्ये असलेला परमात्मा अंशही संतोषित होतो.

श्रुति-स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रमधर्माचे आचरण केले पाहिजे. त्याविरूध्द वर्तन केल्यास इहलोकामध्ये कष्ट भोगून परलोकांतही सुखाची प्राप्ती होत नाही.

‘ समजून उमजून चुका करण्याच्या मला या विस्मृतिरूपी जगतांतून उध्दर ! ‘ अशा अर्थाची वेदामध्ये परमात्म्याची प्रार्थना केलेली आढळते. ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये नेहमी ठेवून जन्मसार्थकता करून घ्या ! असा मीही तुम्हाला उपदेश करतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img