Literature

माघ वद्य नवमी

श्रीसमर्थांनी देह ठेविला तो वार शनिवार, माघ वद्य नवमी दिवसा दोन प्रहरी- अवतारसमाप्तीच्या शेवटच्या क्षणी श्रीसमर्थांनी आम्हाला आशिर्वाद दिला तसेच राष्ट्रगुरूंनी राष्ट्रालाही दिला.

*’ माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंतकरणी | परीमी आहे जगज्जीवनी | निरंतर || आत्मारामदासबोध | माझे स्वतः सिध्द | असतां न करावा खेद | भक्तजनी | ‘* माझी काया गेली म्हणून माझा नाश झाला असे मानू नका ! ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले त्यांनी मृत्यूला जीवंतपणीच जिंकलेले असते. मी देह नसून चैतन्यघन आत्मा आहे असे ज्ञान ज्यांना झाले तेच आत्मज्ञानी. आत्मरूपास जन्ममरण नसते. त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्यांना मान झाले ते ब्रह्मस्वरूप होऊन राहिले. त्यांत कोणतीही उपाधी रहात नाही, हेच तत्त्व श्रीसमर्थांनी अंतःकालीही उकलून दाखविले. ‘ मी या शरीराने तुम्हाला दिलो नाही तरी मी सर्वांच्या ह्रदयात असून चिदानंदरूपाने कोठेही जात येत नाही. ‘ श्रीसमर्थांनी आपल्या महाप्रयणाच्या वेळी *’ आत्माराम दासबोध ! माझे स्वरूप स्वतः सिध्द | ‘* असा शिष्य मंडळींना सांगून ‘ नका करू खटपट ! पहा माझा ग्रंथ नीट ! ‘ अशी सर्वांना आज्ञा केली आहे. मोक्षाकरता काहीही खटपट नको. माझे स्वरूपच असलेले दासबोध, आत्माराम हे ग्रंथ नीट पहा ! कारण *तेणे सायुज्यतेची वाट | ठायी पडे ||* खात्रीनेच दिसेल असा निश्चय बाणून घ्या ! त्यात कोणतीही शंका असु नये. श्रीसमर्थांनीच हे सर्वांना सांगितले असल्याने ब्रह्मैक्य लाभेल किंवा नाही अशी शंकासुध्दा मनात नको !!

*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img