Literature

माघ शुद्ध द्वितीया

मन नेहमीच सुखाची आशा करीत असते. जे खरे सुख नाही तेच सुख होय अशी भावना ते करून घेते. बाह्य अवडंबर, स्वेच्छाचार हेच सुखकर होत अशी त्याची समजूत असते. साखरेला मुंगी लागणे जसे स्वाभाविकच असते. त्याचप्रमाणे विषयसुखामध्ये अशुध्दमन मग्न होणे स्वाभाविकच !

*मनो हि द्विविधं प्रोक्तं शुध्दं चाशुध्दमेव च !*
*अशुध्द कामसड्•कल्पं शुध्दं कामीविवर्जतम् ||*

मनाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार- दुःख पर्यववासी अशा या जगातील कामक्रोधादि षड्रिपूमध्ये अडकून विषयलोलूपतेने पापसंचय करण्याची प्रवृत्ती असणे. ही प्रवृत्ती मनुष्यास स्वानुभवास दुःसाध्य व दुःखकोपाला कारणीभूत होते.
दुसरा प्रकार निष्कामवृत्तीचा, परिशुध्द, मोक्षप्रद अशा गुणधर्माने युक्त असतो. दुसऱ्या प्रकारचे मन आपला उध्दार करून घेऊन आपले अनुकरण करणाऱ्या मनुष्याचाही उध्दार करण्याची शक्ती धारण करणारे असते. कामक्रोधादिदुर्वासनारहित होऊन शाश्वत सौख्याची इच्छा करणे हेच परिशुध्दमनाचे लक्षण होय. विषयसुखांत मग्न होऊन सत्यनित्य–सुख सोडून दु:खच सुख आहे असे समजून पापगर्तेत अडकून पडणे हेच अशुध्दमनाचे लक्षण होय. असे अशुध्द मन शुध्द करण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील असले पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img