Literature

माघ शुद्ध प्रतिपदा

 *’ मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: | ‘* असे भारतीय तत्त्वज्ञानद्योतक एक महावाक्य आहे. मनुष्यास बंधन किंवा मोक्ष प्राप्त होण्यास मनच कारणीभूत आहे. असाच याचा अर्थ आहे. बंधन म्हणजे प्रपंचासक्ती मुक्तिमार्गासाठी प्रयत्न करून सत्कार्यनिरत होण्यास मनच कारण आहे. या दोन्हींपैकी आपणास कोणते ग्राह्य व हितकर वाटते.

*’ बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् | ‘*

 विषयोपासक मुढ मनुष्य प्रपंचात राहून सन्मार्गाकडे न जाता इतस्ततः इकडे तिकडे भटकत असतो तर सत्पुरूष विषयाभिलाषा नष्ट करून मोक्षमार्गाकडे जातो. स्वभावतःच मन अतीव चंचल आहे. त्याच्या निग्रहासाठी प्रबल अशरी निग्रहशक्ती आवश्यक असून दिर्घकाळ विवेकाभ्यासही पाहिजे, अशी भावना प्रथम निर्माण होणे आवश्यक आहे. साधनेने आपण निग्रहशक्ती प्राप्त करू शकु. 

  *’ लालयेच्चित्तबालकम् | ‘* 

हट्टी असणाऱ्या मुलांची बुद्धिमान आई ज्याप्रमाणे त्याची समजूत घालते त्याप्रमाणे विचारशील मनुष्याने निरनिराळ्या प्रकाराने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img