Literature

मार्गशीर्ष वद्य अमावस्या

आधिभौतिक सामर्थ्य श्रेष्ठ की अध्यात्मिक सामर्थ्य श्रेष्ठ ? ॲटम बॉम्ब- अणुबॉम्बमुळे आधिभौतिक शक्तीचे ज्ञान सर्व जगास झाले आहे. अणुबॉम्बच्या शक्तीला निष्प्रभ करणारी तेजस्वी अशी दुसरी शक्ती आहे काय ? याचा विचार करूया !

अध्यात्मिक म्हणजे आत्म्यासंबंधीचे विचार व आधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतासंबंधीचे विचार होत. दृश्य पदार्थाचे सामर्थ्य श्रेष्ठ की आत्मसामर्थ्य श्रेष्ठ याचा विचार केल्याने परमेश्वरी सामर्थ्य व पदार्थाचे सामर्थ्य यामध्ये कोणते सामर्थ्य श्रेष्ठ आहे याचा उलगडा होईल.
परमात्मप्रणीत अशा या जगात असणारे सर्व पदार्थ हे भौतिक पदार्थ होत. *’ए त आत्मा सर्वान्तर: |’* ‘तुझा आत्मा सर्वातरयामी परमात्मा होय असे श्रुती म्हणते.आत्मा व परमात्मा हे दोन्ही शब्द एकाच अर्थी आहेत. आम्ही म्हणजेच परमात्मा. त्याच्या सामर्थ्यामुळे उत्पन्न झालेले सर्व पदार्थ व त्या पदार्थाच्या विशिष्ट संमिश्रणाने उत्पन्न झालेले विशिष्ट सामर्थ्य यापेक्षा परमात्म्याचे सामर्थ्य निश्चितपणे श्रेष्ठ आहे.

*’ एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्च पुरूष: |’*

‘जगांत दिसणारा महिमा ज्याने निर्माण केला त्याचा महिमा कितीतरीपटीने श्रेष्ठ आहे असे श्रुती म्हणते.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img