Literature

मार्गशीर्ष वद्य अष्टमी

जीवन विस्मृतीमय असल्याने ऐकलेले विसरले जाते. ऐकलेले व पाहिलेले नीटपणे समजवून घेऊन असलेल्या परमेश्वरी अंशाला ओळखून न विसरता पुढे पुढे गेल्यास आपण भवसागर पार करू शकतो.

परमात्मा सर्वसमृध्द आहे. त्यामुळे तो सर्वकाही उत्पन्न करू शकतो व सर्वकाही देऊ शकतो; ही गोष्ट सर्वांना माहित आहे. पण योग्य आचरणाने देवास ओळखणारे फारच थोडे. परमात्मा सर्वशक्तिमान आहे एवढेच ओळखल्याने व मानल्याने काहीही होणार नाही. परमात्मा एखाद्या हुशार सावकारासारखा आहे. आपले धन पळवून नेण्यासाठी आलेल्या मनुष्यास तो दाद देत नाही. बाहेरच्या एखाद्या सावकारास फसविणे शक्य असले तरी अंतर्यामी सर्वसाक्षीभूत असणाऱ्या परमात्म्यास फसविणे शक्य आहे काय ? त्याला संतुष्ट व वश करून घेण्यासाठी त्रिकरण शुध्दीची गरज आहे. षड् रिपूंना जिंकुन मनसामर्थ्याच्या बळाने, परिष्कृत दृष्टीने पाहिल्यास परमेश्वर दिसणे शक्य होते. परिष्कृत ह्रदयाने भक्ति केल्यास भक्ताधीन, दयावंत, मागितलेले देणारे असा दयासागर परमेश्वर संतुष्ट होतो. अनन्यता, शुध्दचित्त ही नसल्यास परमेश्वरप्राप्ती नाही व त्याची कृपा पण होणार नाही. विवेकबुध्दीनेच परमात्मप्राप्ती शक्य आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img